Friday 13 November 2015

'कट्यार काळजात घुसली..' AVADHOOT GUPTES post on Katyar.. Post on FB..

लहानपणी आईबाबांच्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं. पुढे गायक म्हणून कारकीर्द सुरु झाल्यावर संदर्भ गहिरे झाले. अभीषेकिबुवा वगैरे .. सुरत पियाकी.. खाँसाहेब.. व्यक्तिरेखा .. कलाकार .. माणसं .. तुकड्या तुकड्यानं.. जिगसॉ पझल मधल्या सारखं .. रायगड आणि महाराज एकत्र कळत आणि मिळत जावे तसं काहिसं होत होतं..

आणि अचानक!! 'जुरासिक पार्क' film मधे डायनॉसॉरवर रिसर्च करणा-या हिरोला कुणितरी डायरेक्ट हजारो डायनॉसोर्र्सच्या मध्यभागी नेऊन ठेवल्यावर जे वाटावं ना.. तेच नेमकं वाटलं मला. सुबोध भावेचा 'कट्यार .. ' पहिल्यावर!!

अानंद ह्या गोष्टिचा झाला, की मी 'एक तारा' करण्या मागची भूमिका आणि त्यामागचं उद्देश्श्य हे अनेक वर्षांपूर्विच कुणालातरी दिसलं होतं, हे कळलं. माझा मूर्खपणा हा की मी 'ते' कधी अभ्यासलं नव्हतं.. पण माझा शहाणपणा हा की 'ते' न अभ्यासता देखील मलाही 'ते' तितकचं महत्वाचं वाटलं होतं आणि त्या 'ग्रेट' विचारवंतांमधे आणि माझ्या विचारांमधे काहितरी साधर्म्य होतं!!

आणि 'ते' म्हणजे.. कलाकाराचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे "अहंकार"!!

असो!!

मी चित्रपट पाहून बाहेर आल्यावर सुबोधला मिठीच मारली! डोळ्यातले अश्रू थांबवणं अशक्य होतं. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात एवढी मोठी बाजी मारणं.. हे सुबोधच्या अथक परिश्रमाबरोबरच एकतर 'नशीब'!! आणि दुसरं महत्वाचं म्हणजे 'संस्कार'!! 'भावे' आडणावाखेरिज.. 'पुणे' गावाखेरिज.. हे कुणालाही शक्य नाही!! 'जात' न मानणा-यांनी ह्या चित्रपटाचा फक्त 'रिमेक' करुन दाखवावा!! "टिळक" किंवा "कट्यार" करायला "भावे"च लागतात !!

(कृपया नोंद घ्यावी: मी 'भावे' किंवा 'पुणेरी'ही नाही!)

पुन्हा .. असो!!

जुन्या गाण्यांमधली Original Value जपतानाच नवीन गाणी देण्याचं धाडस दाखवणे असो... संहितेमधे राजगायकाची भूमिका लांबवण्याचे धाडस असो.. अमृता बरोबरचा One Shot असो.. प्रत्येक ठिकाणी मला जाणवली ती म्हणजे दिग्दर्शकाची संहितेवरिल 'स्वामित्वा'ची भावना! 'हे सगळं माझं आहे.. आणि मी त्यावर एवढं प्रेम केलंय की त्यामधे वाट्टेल ते बदल करायचा हक्क मला माझ्या ह्या प्रेमानी दिलाय!! "कुणाचा बाप मला 'का?' म्हणून विचारू शकत नाही" ही भावना प्रत्येक फ्रेममधे जाणवते! आणि तीच प्रचंड भावते!!

जोडिला कलाकारांनी जी कामं लाजवाब कामं केलियेत त्याला तोड नाही!! असे सचिनजी दिसलेच नाहीत. त्यांच्या उर्दुच्या अभ्यासाचं चीज एवढं कधी झालंच नाही. त्यांना त्यांच्या 'heroism' ची कवच कुंडलं काढून ठेवून फक्त 'Actor' म्हणून सिद्ध करणारी अशी भूमिका कधी मिळालीच नही. अमृता खानविलकर ही नाच न करता सुद्धा एवढी अपील होऊ शकते हे कधी कळलंच नाही. ती Star सोडता 'अभिनेत्री' म्हणून एवढी कधी भिडलीच नाही. मृण्मयी सुद्धा.. किती वेगळी दिसलिये .. किती वेगळी वागलिये ..

पलसानेंच्या कॅमेर्यापासून ते संतोष फुटाणेंच्या नेपथ्यापर्यंत आणि काजव्यांच्या सीन खाऊन जाण-या Special effect च्या Team पर्यंत प्रत्येकाच्या कामाबद्दल लिहिण्यासारखं खूप खूप आहे!! पण .. असो!!

माझी तमाम मराठी बाधंवांना हीच विनंती आहे आहे की.. जो चित्रपट तुमची नातवंडे दहा दहा वेळा Internet वर पाहून आणखी ३० वर्षांनी तुम्हाला प्रचंड प्रश्न विचारणार अहेत... त्यातला एक प्रश्न "तुम्ही हा चित्रपट theatre मधे पाहिला होता ना?" हा असणार आहे. त्याचं उत्तर 'नाही' असं द्यावं लागल्यास तुमची जी हालत होईल.. ती नको असल्यास हा चित्रपट जरुर.. जरूर theatre मधे जाऊन पहा!!

No comments:

Post a Comment