Sunday 6 December 2015

ना मस्जिद आजान देती, ना मंदिर के घंटे बजते - हरिवंशराय बच्चन

, ना मस्जिद आजान देती, ना मंदिर के घंटे बजते

ना अल्ला का शोर होता, ना राम नाम भजते

ना हराम होती, रातों की नींद अपनी
मुर्गा हमें जगाता, सुबह के पांच बजते

ना दीवाली होती, और ना पठाखे बजते
ना ईद की अलामत, ना बकरे शहीद होते

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता....
…….काश कोई मजहब ना होता....

ना अर्ध देते , ना स्नान होता
ना मुर्दे बहाए जाते, ना विसर्जन होता

जब भी प्यास लगती , नदिओं का पानी पीते
पेड़ों की छाव होती , नदिओं का गर्जन होता

ना भगवानों की लीला होती, ना अवतारों
का
नाटक होता
ना देशों की सीमा होती , ना दिलों का
फाटक
होता

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता.....
…….काश कोई मजहब ना होता....

कोई मस्जिद ना होती, कोई मंदिर ना होता
कोई दलित ना होता, कोई काफ़िर ना
होता

कोई बेबस ना होता, कोई बेघर ना होता
किसी के दर्द से कोई, बेखबर ना होता

ना ही गीता होती , और ना कुरान होता
ना ही अल्ला होता, ना भगवान होता

तुझको जो जख्म होता, मेरा दिल तड़पता.
ना मैं हिन्दू होता, ना तू मुसलमान होता

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता।

–हरिवंशराय बच्चन

Friday 4 December 2015

तरुणांसाठी

तरुणांसाठी :--

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.💮

2) दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.💮

3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.💮

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.💮

6) मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.💮

7) चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत देवस्थळी, प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल.💮

8) इंग्लिश बोलायला शिका.
     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮

9) व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.

कुलकर्णी विशेषांक

कुलकर्णी विशेषांक 😎😃



"नावात काय आहे..." ...
हे शेक्सपियरचे शब्द त्याच्याच नरड्यात घालायचे काम ... भारतातील कुलकर्णी नावाची माणसे करत आहेत, असे मी नेहमी म्हणतो, ज्यात काडीचीही  अतिशयोक्ती नाही.
.
कोणतेही क्षेत्र असो, 'कुलकर्णी' आपला ठसा उमटवतातच असे पूर्वी म्हटले जायचे...
आता..... कुलकर्णी ज्या क्षेत्रात जातात, त्याक्षेत्राचे नाव उंचावतात असे म्हटले जाते....
कुलकर्णी कुलोत्पन्नांनी ... म्हणजे अगदी, ज्ञानेश्वरांपासून अलौकिक साहित्य निर्मिती करून नाव कमवायला सुरवात केली ...
संत एकनाथ महाराज सुद्धा कुलकर्णी कुलोत्पन होते ...
निवृत्ती नाथ, संत सोपान यांनी कुलकर्णी आडनाव अधिक उंचावर नेले
.
जिजाबाइंनी , शिवाजीला योग्य शिक्षण मिळावे म्हणून ज्यांची नेमणूक केली होती ... ते दादोजी कोंडदेव हे दुसरे, तिसरे कोणी नव्हते तर कुलकर्णी कुलोत्पन होते.
.
रामचंद्र पंत अमात्य आणि परशुराम त्र्यंबक यांचे शिवाशाहीतले योगदान असामान्य होते.
.
अफजलखानाला सुद्धा कुलकर्णी लोकांचे महात्म्य समजले होते... म्हणून, त्याने प्रतापगडावर शिवाजीला भेटण्यापूर्वी, कृष्णाजी भास्कर नावाच्या आसामी ला वकील नेमले होते... जे दादोजी कोंडदेव ह्या कुलकर्णी कुलोत्प्नाच्या शिष्याला कोंडीत पकडू शकतील.
.
वि.म., जी, ए., वा.ल., व.दि., द. भि.,गुरुनाथ, कृष्णाजी पांडुरंग असे अनेक मराठी साहित्तिक स्वत:चा ठसा ... कोरून ... गेले आहेत...
कला क्षेत्रात ... जयवंत, सलील, ...सोनाली , सोनाली, मृणाल,नीना, दिलीप, मंगेश, गिरीश , अतुल, संदीप, सुकन्या, ममता, पल्लवी हे 'कलाकार' तर दुसर्या आडनावाच्या लोकांना ... इथे चुकून आलात का ...असेच विचारात असावेत असे वाटते
पठ्ठे बापूराव, चुकून वेगळ्याअशा कला क्षेत्रात, म्हणजे, तमाशा, लावणी करणाऱ्या लोकान एकरूप झाले. ... पण तमाशा, लावणी ह्या क्षेत्राचे नाव उंचावर नेले ... आणि स्वत:चेही
धोंडूताई कुलकर्णी यांच्या गायना नंतर ... सूर लावायची हिम्मत कोणताही गायक / गायिका करत नसे ...
.
डी एस कुलकर्णी यानी पुण्यातली अर्ध्याहून जास्त घरे बांधली आहेत असे सांगितले तर अचंबा वाटणार नाही...
सुपर कॉम्प्युटर बनवणाऱ्या सी ड्याक मध्ये संचालक असलेल्या , मंगेश या माणसाचे आडनाव कुलकर्णी होते... हा काही योगायोग नाही.
क्रिकेट मध्ये निलेश, धवल, उमेश, राजू अशी बोलिंग करतात कि त्यांच्या समोर फलंदाज टिकत नाहीत
बीजेपीचे प्रमोद महाजन जेंव्हा सुसाट धावत होते, भारताला शायनिंग वाढवत होते तेंव्हा त्याना एनर्जी द्यायचे काम संघाचे ...सुधींद्र कुलकर्णी हेच करत होते.
.
'कुलकर्णी' नावाचे महात्म्य इतके आहे की जगप्रसिद्ध, आनंद या राजेश खन्नाच्या सिनेमात ... रमेश देव चे नाव ... डॉक्टर प्रकाश कुलकर्णी असे होते... म्हणजे...मराठी माणूस जर शिकलेला असेल तर त्याचे आडनाव कुलकर्णीच असणार ... हे हृषीकेश मुखार्जीना सुद्धा वाटत होते.
आज सुनील कुलकर्णी या कायदेतज्ञाची, अमिरिकेत, न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याचे समजले तेंव्हा म्हटले ... की शेक्स्पीयरचे वाक्य चूक ठरवायची हिम्मत केवळ कुलकर्णी हे आडनावात आहे ...
जाता जाता .....
-------------
त्या इन्फोसिस च्या नारायण मूर्तीचे नाव झाले, कारण, त्याला कुलकर्ण्यांची 'सुधा', सहचारिणी लाभली म्हणून...
.
To all  KULKARNI

Wednesday 2 December 2015

स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द

स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द -

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुुंग यशाची शिखरं गाठली...
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले...

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं...

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस 'आतून' फक्त आणि फक्त पिळवटतच जातो...अगदी माझ्यासारखा...

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच...संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही...केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती...जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजाराे मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा...हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?..."आजारपणाचा बिछाना" …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात...पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपलं आयुष्य".

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात 'आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय' ही जाणिव असते...ते पुस्तक असतं "निरोगी जगण्याचं पुस्तक".

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

कुटूंबावर, पती-पत्नीवर, मित्र-मैत्रिणींवर प्रेम उधळत जा...

स्वत:कडे दुर्लक्ष्य  करू नका...स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही प्रेमानं वागवा.

१२

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.

मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्ष १२ महिन्यांचे.

आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात.बारावा गुरू, शनि, मंगळ हानिकारक समजले जातात.

पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.

घड्याळात आकडे बारा. पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.

पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे  मध्यरात्र झाली असे समजत.

एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.

जिकडेतिकडे सकाळीभरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.

पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.

इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.

नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.

१२ बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ. शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.

एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.

तसेच  कोणाचेही न ऐकणाय्रा  रंगेल व रगेल  दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही "काय बाराचा आहे हा" असा शब्दप्रयोग वापरतात.

१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.

मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.

१२ गावचा मुखिया.

जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.

अशी ही १२ ची किमया...
.
.
.
.
.
.
.
.



.
.







.
.

.







.
.
.
.
..
..

.
..
.
.
,

,



आणि म्हणूनच पवार साहेबाच्या गावाच नाव 12मती.......!!!!

आणि पुणेकर MH-12

Monday 30 November 2015

अन्त में हम दोनों ही होंगे

अन्त में हम दोनों ही होंगे !!!.

भले ही झगड़े, गुस्सा करे,
एक दूसरे पर टूट पड़े
एक दूसरे पर दादागिरि करने के
 लिये, अन्त में हम दोनों ही होंगे

जो कहना हे, वह कह ले,
जो करना हे, वह कर ले
एक दुसरे के चश्मे और
लकड़ी ढूँढने में,
अन्त में हम दोनों ही होंगे

मैं रूठूं तो तुम मना लेना,
तुम रूठो ताे मै मना लूँगा
एक दुसरे को लाड़ लड़ाने के लिये,
अन्त में हम दोनों ही होंगे

आँखे जब धुँधली होंगी,
याददाश्त जब कमजोर होंगी
तब एक दूसरे को एक दूसरे
मे ढूँढने के लिए,
अन्त में हम दोनों ही होंगे

घुटने जब दुखने लगेंगे,
कमर भी झुकना बंद करेगी
तब एक दूसरे के पांव के नाखून काटने के लिए,
अन्त में हम दोनों ही होंगे

"मेरी हेल्थ रिपोर्ट एक दम नॉर्मल
 है, आइ एम आलराईट
ऐसा कह कर ऐक दूसरे को
 बहकाने के लिए,
अन्त में हम दोनों ही होंगे

साथ जब छूट जायेगा,
बिदाई की घड़ी जब आ जायेगी
तब एक दूसरे को माफ करने के लिए,
अन्त में हम दोनों ही होंगे....

Sunday 29 November 2015

संडे मूड - मंगेश तेंडुलकरांचं

मंगेश तेंडुलकरांचं 'संडे मूड' हे पुस्तक..त्यातील एक प्रेरणादायी वर्णन.

पुण्यातला तेव्हाचा लाकडी पूल आणि जोंधळे चौक या दरम्यान (१९४१-४२) माझ्या वडिलांचे पुस्तकाचे दुकान होतं. घरी माझा व्रात्यपणा नियंत्रणाबाहेर जात असल्याकारणानं वडील मला दुकानात न्यायचे.

संध्याकाळचा साडेपाचचा सुमार. समोर दुकानात आणि रस्त्यावर तुरळक वर्दळ होती.
"ते समोरच्या दुकानात पाहिलेस? ते आपले धोंडो केशव कर्वे आहेत!" वडिलांनी सांगताच माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. डोक्यावर टोपी, कृश, पाठीत पोक असलेले शांत गृहस्थ. त्यांनी तिथं धान्य खरेदी केलं. जवळपास अर्धं पोतं भरेल इतकं. दुकानाच्या कट्ट्याच्या चार पायऱ्या उतरून रस्त्यावर आले. कट्ट्यावरचं धान्याचं पोतं पाठीवर घेतलं आणि रस्त्याकड बघत पुलाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कुणी आपल्याकडे बघेल, मदत करील ही अपेक्षाच त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. हे माझं काम आहे आणि मीच ते करायचं, इतक्या सहजतेने ते पोत्याचा ओझं पाठीवर घेऊन चालत होते- कर्मभूमी हिंगण्याच्या दिशेनं. त्यांची पावलं सावकाश चालत अंतर कपात होती.

जो तेव्हा पुण्यातला सर्वाधिक उद्धट, उर्मट समजला जायचा, असा टांगेवाला धोंडो केशवांच्या दिशेने पुढे गेला आणि त्यानं वळून पाहिलं. धोंडो केशवांना त्यानं ओळखलं. टांगा उभा करून तो खाली उतरला. धोंडो केशव त्याला हातांनीच पुढं जायला सांगत होते. धोंडो केशव यांच्या पायाला स्पर्श करून तो म्हणाला, "माझ्या बापा, तुझ्या पाठीवरचं ओझं बघून मी पुढे गेलो तर देव मला नरकात पाठवेल रे. आण ते पोतं इकडं." पाठीवरचं पोतं घेऊन टांगेवाल्यानं ते त्याच्या टांग्यात टाकलं. धोडो केशव यांना हाताला धरून टांग्यात बसवलं आणि तो टांगा हिंगण्याच्या दिशेने निघाला.

हा प्रसंग - आज ७० वर्ष झाली त्याला - जसाच्या तसा स्मरणात राहिला. जे काम माझं म्हणून स्वीकारलं, ते मीच करायचं. कौतुकाची, मदतीची अपेक्षा नं ठेवता ते करायचं. ज्यांच्यासाठी करायचं, त्यांच्यावर उपकार केल्याची भावना ठेवायची नाही.. प्रसंगी कृतघ्नपणासुद्धा मुकाट स्वीकारायचा. नाउमेद व्हायचं नाही. करतो आहे ते चांगल काम आहे, करत राहीन. माझ्या निर्णयाचा मान माझ्या वयाला आणि प्रकृतीला राखावाच लागेल...यातल एक अक्षर ही न बोलता, धोंडे केशव कर्वे हे सांगून गेले. नुसते सांगून गेले, असं नाही, तर पाहणाऱ्याच्या आयुष्यभर लक्षात राहील, असा परिणाम साधून गेले.

Tuesday 24 November 2015

मी पैसा बोलतोय

सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो, मी आहे पैसा. माझ साधारण रूप आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे. मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे. कारण मनुष्य मला आदर्श समजतो. आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात, आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही, परंतु लोक मला स्वताच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात. मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात. खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वताचाहि  जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.

मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.

मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.

मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो पण तुमच वय नाही वाढऊ शकत.

मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो पण गेलेली वेळ नाही.

मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो पण आदर नाही.

मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो पण शांत झोप नाही.

मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो पण विद्या नाही.

मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

म्हणून लक्षात ठेवा
पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका . पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका. माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.

आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ  हेच आपले धन आहे, त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हांला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत. तुम्ही केलेला परोपकार,दुसऱ्याना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती,त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे.तेव्हा सेवा,साधना व सतसंग करा.आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार...............    

Friday 20 November 2015

Kaushal S. Inamdar एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात

Kaushal S. Inamdar एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात ....
एक विचार मनात आला. कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधयचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल?


मुकेश हे लिंबू सरबत आहेत. जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य!

मन्ना डे हे दूध आहेत. पौष्टिक आणि शक्तिवर्धक. पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !

गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत. येवू घातलेली झोप उडवतात.

आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि नशा अनुभवावी.

महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत. सोनेरी, उत्तम दर्जा आणि ॲएडिक्टिव्ह.

तलत मेहमूद.... उसाचा रस! एकदम गोड आणि थंड पण एक किंवा जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स! जास्त घेवू शकणे अशक्य!

महेन्द्रकपूर.... म्हणजे ताक जमलं तर एकदम फक्कड नाहीतर. ...जावू देत!

किशोर कुमार चहा आहेत - कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा. दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून, जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा, इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तच वाटतो. (शिवाय माझं आवडतं पेय आहे!)

आणि शेवटी लता मंगेशकर. त्या पाणी आहेत. नितळ, पारदर्शक, स्वच्छ, शुद्ध! तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय.

साड्यांचे रंग...- पु ल देशपांडे

साड्यांचे रंग...
----------------

"ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं...

"लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न...

"बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न...

"श्रीखंडी?... नको... चिकट असेल..." मी उगाच विनोद मारायचा प्रयत्न केला... पण त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हालली नाही...

"बरं, ते ही जाऊ दे.... चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा" बायकोनी विचारलं...

आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला लागली...

जगात "ता ना पि हि नि पा जा" हे एवढेच सातच रंग असतात ही माझी पक्की समजूत होती आणि आहे... त्यातल्याही, तांबड्या आणि नारंगीत किंवा निळ्या आणि जांभळ्यात मला पटकन फरक समजत नाही... या शिवाय पारवा हे रंगाचं नसून कबुतरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव आहे अशी माझी अनेक वर्षं समजूत आहे...

हे सात रंग आणि सरधोपट पांढरा किंवा काळा हे रंग सोडले रंगांच्या इतर छटा एकतर मला ओळखता येत नाहीत किंवा काहीतरी वेगळं आहेच असं वाटलं तर त्यांची नावं मला समजत नाहीत...

माझा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे, मला हिरवा रंग हिरवाच दिसतो, त्यातल्या कशाला पोपटी म्हणायचं, कशाला सी ग्रीन म्हणायचं आणि कशाला बॉटल ग्रीन हे कळत नाही... तेच निळ्या रंगाचं... निळा म्हणजे निळा... त्यात स्काय ब्लू कोणता आणि मोरपंखी कोणता याचंही मला आकलन होत नाही...

या शिवाय, "डाळिंबी" हा रंग नसून ते "मोसंबी" सारखं देशी दारूचं नाव असावं, "तपकिरी" हे तपकीरचं अन "शेवाळी" हे शेवाळ्याचं अनेक वचन असावं आणि मोतिया हे एखाद्या नबाबाघरच्या पांढऱ्या कुतियेचं नाव असावं अशीही माझी अनेक वर्षं समजूत होती...

पण बायको बरोबर साड्यांच्या दुकानात गेलं की या साऱ्या साऱ्या समजुतींना सुरुंग लागतो. अन या सुरुंगाच्या स्फोटातून लाल, तांबड्या, नारंगी, चिंतामणी, पिवळ्या आणि लिंबू रंगांच्या ज्वाला उसळायला लागून त्यातून राखाडी, पारवा, तपकिरी, किरमिजी रंगांच्या धुराचे लोट उसळायला लागतात...

असो. तर मी असा माझ्या अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या घेत असतानाच बायकोचा पुढचा प्रश्न आला....

"ही केतकी रंगाची साडी कशी आहे? बघ ना... आमसुली काठ आहेत..."

"आमसुली?" माझा शेवटचा प्रश्न असतो...

त्याकडे दुर्लक्ष करून बायको ती साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःला न्याहाळायला लागते.

अन आपल्याला आवडलेली साडी अंगावर लपेटून आरशात स्वतःकडेच बघत असताना, तिच्या चेहऱ्यावर जो रंग उजळलेला दिसतो त्या रंगाचं नाव काय असावं याचा मी विचार करत बसतो....

- पु ल देशपांडे

रतन टाटा यांनी ट्विटरवर

नुकताच रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर आला.
मुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे.
जर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल.
मी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत.
तेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना?
पुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या.
आम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या स्थानीक प्रतिनिधीने थोड्या जास्त डिशेस ऑर्डर केल्या. जेवण संपवून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही ऑर्डर केलेल्या अन्नापैकी बरेचसे अन्न तसेच उरले होते.
आम्ही जेव्हा निघालो तेव्हा कांही वृद्ध महिला आमच्याशी इंग्लीशमधे बोलू लागल्या. आम्ही बरेचसे अन्न टाकून निघालो होतो हे त्यांना आवडले नव्हते.
‘हे पहा! आम्ही हॉटेलचे पुर्ण बिल दिले आहे. त्यामूळे आम्ही किती अन्न मागे ठेवले याचे तुम्हाला काही देणे घेणे नाही!’ माझ्या सहकार्या्ने सांगीतले.
त्यातील एक महिला फारच चिडली.
तिने लगेच तिच्या पर्समधून सेल फोन काढला व कोणालातरी फोन केला. काही वेळातच सोशल सिक्युरिटीचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस तेथे आला. आम्ही अन्न तसेच टाकून जात आहोत हे कळल्यावर त्याने आम्हाला तेथल्या तेथे 50 युरो ( अंदाजे 3800 रुपये) दंड केला व म्हणाला
'जेवढे अन्न तुम्ही खाऊ शकत असाल तेवढ्याच अन्नाची ऑर्डर देत चला. पैसे जरी तुमचे असले तरी हे अन्न बनवायला जी साधन सामग्री लागते ते आमच्या सोसायटीची म्हणजे समाजाची आहे. जगात अनेक लोक असे आहेत कि त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. तेथे साधनांची कमतरता आहे. साधन सामग्री वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधीकार नाही.’
एका श्रिमंत देशामधील लोकांची मानसिकता बघून आम्हाला आमच्या मानसिकतेची लाज वाटली. आपण अशा देशामधून आलेलो आहोत की जेथे साधनांची कमतरता आहे.
असे असताना सुद्धा आपण पुष्कळ अन्न मागवतो व वाया घालवतो.
अमेरिकेमधे सुद्धा मला हाच अनुभव आला. तेथील अमेरिकन, थाई, चायनीज, मेक्सिकन हॉटेल्समधे अन्न टाकणे किंवा अन्नाची नासाडी करणे निषीद्ध समजले जाते. काही अन्न शिल्लक राहिल्यास थर्मोकेलच्या बॉक्सेस देण्यात येतात. त्यामधे उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जायचे असा रिवाज आहे. बुफेमधे सुद्धा लोक जेवढे पचेल तेवढेच अन्न प्लेटमधे घेतात.
आपल्याकडे मात्र उलटी परिस्थिती आहे. लग्न, मुंज, पार्टी, जेवणावळी, हॉटेल्स यामधे कितीतरी अन्न रोज वाया जात असते. बुफेमधे सुद्धा लोक प्लेटी भरभरून घेत असतात व त्यातले बरेच पदार्थ फेकून देत असतात.
आपण सुद्धा आता अन्न कसे वाया जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटते?

जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही


माउली नंतर समाधी नाही |

तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही |

शिवराया नंतर छत्रपती नाही|

गंधर्वा नंतर गाणं नाही |

माशा नंतर पोहण नाही |

रामानंतर आचरण नाही |

रावणानंतर श्रीमंती नाही |

गरुडानंतर भरारी नाही |

मेघा नंतर उदारता नाही |

कर्णा नंतर औदार्य नाही |

साधु नंतर कृपा नाही |

देवा नंतर आशिर्वाद नाही |

आई नंतर प्रेम नाही |

मृत्यू नंतर भय नाही |

नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि......
जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही,
म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण;
जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही ||

चांगलीच विचारधारा  जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही. .......☝
 दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........☝
 सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......☝
 समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......☝
 मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......☝
 आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........☝
 सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......☝
 उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......☝
 जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....☝
 काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......☝
 मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......☝

चालणारे दोन्ही पाय किती विसंगत,
एक मागे,
एक पुढे असतो,
पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत,
ह्याच नाव "जीवन" आहे.🙏
🐾साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
🐾हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
🐾जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
🐾साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
🐾तोडताना एक घाव पुरतो
जोडताना किती भाव मोजावा लागतो
🐾विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ...

🐾समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
🐾काहीजण त्यातुन मोती उचलतात,
🐾काहीजण त्यातुन मासे घेतात तर
🐾काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
🐾हे विश्व पण सर्वानसाठी सारखेच आहे,
🐾फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.

मिलिट्री

गावातल्या आडावर ४
बायका पाणी भरत होत्या.

त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन
निघाला होता, तर त्याला पाहुन
ती म्हणाली,
तो बघा माझा मुलगा सगळ्यात
मोठा पहलवान आहे.

पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर
त्याला पाहुन ती पण
म्हणाली तो बघा माझा मुलगा मुख्याध्यापक आहे.

त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन
निघाला होता तर त्याला पाहुन
त्याची आई
म्हणाली तो बघा माझा मुलगा सगळ्यात
मोठा व्यापारी आहे.

तेवढ्यात चौथीचा मुलगा तिथुन
निघाला असता त्याने
आपल्या आईला पाहीले व जवळ आला,

पाण्याची कळशी खांदयावर
घेतली नि म्हणाला आई चल घरी.

त्याची आई म्हणाली माझा मुलगा मिलिट्री मधे आहे

कालंच सुट्टीला आलाय

आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी तिघिंच्या नजरा खाली गेल्या.

त्या समजुन गेल्या की खरा मुलगा कुठे घडतो
आहे...
Indian army. .
Making men out of boys.

राम की और रावण

"अगर आप रास्ते पे चल रहे है और आपको वहां पड़ी हुई दो पत्थर की मुर्तिया मिले

1) राम की

और

2)रावण की

और आपको एक मूर्ति उठाने का कहा जाए तो अवश्य आप राम की मूर्ति उठा कर घर लेके जाओगे।
क्यों की राम सत्य , निष्ठा,
सकारात्मकता के प्रतिक हे और रावण नकारात्मकता का प्रतिक हे।



फिरसे आप रास्ते पे चल रहे हो और दो मुर्तिया मिले
राम और रावण की
पर अगर "राम की मूर्ति पत्थर" की और "रावण की सोने "की हो
और एक मूर्ति उठाने को कहा जाए तो आप राम की मूर्ति छोड़ कर  रावण की सोने की मूर्तिही उठाओगे
.
.
.
.
.

मतलब
हम सत्य और असत्य,
सकारात्मक और नकारात्मक
अपनी सुविधा और लाभ के अनुसार तय करते हे।




९९% प्रतिशत लोग भगवान को सिर्फ लाभ और डर की वजह से पूजते है.

Wednesday 18 November 2015

मन - बहिणाबाई चौधरी

मन वाभरं वाभरं
देहा हातून फरार
किती बांधू दावणीला
स्थिर नाही घडीभर

देह श्रोत्यात बसला
मन आत बडबडे
ऐकू कुणाचे कळेना
दोघे घालती साकडे

मना हरणाचे पाय
देह हातावर घडी
आज्ञा अन अवज्ञेची
आत चाले रेटारेटी

देह समजूतदार
बंद ठेवी सारी दारं
मन मांजर चोरटी
मनातल्या लोण्यावर

देह शिक्षित शहाणा
मन यड खुळं बेणं
देह हसे दुसऱ्याला
मन हसे स्वतःवर

देह चुलीपाशी रत
मन फिरे रानोमाळ
देही हिशेब नेटका
मनी कवितेची ओळ

देह टापटीप घडी
मन द्रौपदीचं वस्त्र
देहा लाज अतोनात
मन दत्त दिगंबर

देह घर आवरत
मन आवरतं विश्व
देह कार्यशील मग्न
मन आठवांत रत

देह जागच्या जागी
मन दूर दूर झरे
देह दिनचर्या घडी
मन वेल्हाळ पसरे

देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फूल
मनी मंतरली सृष्टी

देह संसार टुकीचा
मन पसारा अमाप
देह कपाटाचे दार
मन चोरखण आत.

देह जाचतो टाचतो
मन मखमल मऊ
देह वचक दरारा
मन म्हणे नको भिऊ

देह जड जड भिंत
मन झिरपती ओल
देह रंग सजावट
मन गहराई खोल.

देह मन देह मन
जरी तळ्यात मळ्यात
देहा मनाचे अद्वैत
भरी घडा काठोकाठ

‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

⚡प्लेटलेट्सचं कार्य⚡

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

⚡प्लेटलेट्सची संख्या ⚡

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

⚡प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

⚡संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

⚡प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                      
 ⚡नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

⚡१.पपई -⚡

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

⚡२.गुळवेल⚡

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

⚡३.आवळा⚡

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

⚡४.भोपळा⚡

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

⚡५.पालक⚡

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

⚡६.नारळ पाणी⚡

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

⚡७.बीट ⚡

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Tuesday 17 November 2015

नाना पाटेकर यांचा ब्लॉग 1

नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा असा......         शिर्डी साईबाबा  : प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड  +m
सोने  ३२  करोड, + गुंतवणूक ४२७ करोड 
-----------------------------------------------------------------
सिद्धीविनायक , मुंबई
पैशे - २००  करोड , FD : १२५ करोड.
-----------------------------------------------------------------
लालबागचा राजा :
१८  करोड कमाई फक्त  गणपतीच्या  १०  दिवसातली.
 -----------------------------------------------------------------
गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी/मजूर मी स्वतः पाहिलेत अन - त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने  5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.

फक्त 3 देवांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला .
स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी -चोळी-पोशाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी
 --स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात??

मग ह्या गरिबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायकाला मी 'भिकारी' का म्हणू नये?

 मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला -तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला,
एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारन्याने जर या सगळ्या मंदिराचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायची ठरवली तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकत आहे का?            

मुळात एवढा पैसा आला कोठून?
देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिराचे विश्वस्थानाननी  कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?
लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडला?
हि फक्त ३ देवांची नावे होती–
आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेन???
अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरेच आहेत आपल्या देशा –राज्यात--- त्यांचे पैशे किती?

मुळात हा पैसा -म्हणजे नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?
दोन मिनिट असं मानलं कि  भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही.
अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे –गावातले सोडा नुसते मंदिराशेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!

माझ्या इथ ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला…
पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या-पैशाच्या-खऱ्या-मालकांना- गरीब शेतकर्यांना १०० टक्के मिळवून देईन –हे मात्र नक्की…

नाना पाटेकर


पटल तर पूढे forward करा आणि देशाला जाग करा
🇮🇳 Jai Hind 🇮🇳

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत,' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-२० देशांच्या परिषदेत केले. अमेरिकेचे अध्यक्ष बराम ओबामा यांनीही 'आयएस'चे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी दुपटीने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

जी-२० शिखर परिषदेला तुर्कस्तानमध्ये रविवारी सुरुवात झाली. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची गडद छाया परिषदेमध्ये पाहायला मिळाली. या परिषदेमध्ये सर्वसमावेशक आर्थिक विकास आणि हवामान बदल यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये दहशतवादाविरोधात अधिक समन्वय, माहितीचे आदानप्रदान, दहशतवाद्यांना मिळणाऱ्या निधीची रसद तोडणे यांवर ठराव संमत केला जाणार आहे. दहशतवादावरील ठराव हा शिखर परिषदेच्या मुख्य घोषणापत्रापेक्षा वेगळा असेल.

शिखर परिषदेला सुरुवात होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जागतिक नेत्यांबरोबर स्वतंत्रपणे संवाद साधला. यामध्ये तुर्कीचे अध्यक्ष रेसिप अर्दोगान यांचाही समावेश होता. पॅरिसमधील हल्लेखोरांचा पर्दाफाश करण्यासाठी फ्रान्सच्या पाठीशी राहण्याचा आणि 'आयएस'चे जाळे उद् ध्वस्त करण्याचा निर्धार ओबामा यांनी व्यक्त केला. ओबामा म्हणाले, 'सीरियामध्ये शांततापूर्ण सत्तांतर होण्यासाठी आणि पॅरिस, अंकारासह जगातील इतर देशांतील लोकांना त्रासदायी ठरणाऱ्या 'आयएस'ला नष्ट करण्यासाठी मित्रदेशांतील सदस्यांबरोबर दुपटीने आम्ही प्रयत्न करू.'

अर्दोगान म्हणाले, 'जी-२० परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात आमची भूमिका अधिक कठोरपणे मांडली जाईल, असा मला विश्वास वाटतो.' रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न केले, तरच जगाला दहशतवादाचा सामना करता येईल. जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ब्रिक्स' देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याचा या वेळी निषेध करण्यात आला.
....

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेकडे दहशतवादाविरुद्ध आणि अतिरेकी हिंसाचाराविरुद्ध तयार होणाऱ्या सर्वंकष नियोजनाचा आराखडा सुपूर्द करू.
- बान की मून, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे

दहशतवादाविरुद्ध सर्व मानवी समुदायाने एकत्र उभे ठाकले पाहिजे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवरील एकत्रित प्रयत्नांची तातडीने गरज आहे. ब्रिक्स देशांसाठीही हेच प्राधान्य असायला हवे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पॅरिसमधील दहशतवादी हल्ला हा केवळ फ्रान्स, तुर्कीवरील नव्हता, तर नागरी सभ्यतेवरील हा हल्ला होता. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी आणि त्यांना शासन करण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद आणि फ्रान्सच्या नागरिकांबरोबर आम्ही एकजुटीने उभे राहू.
- बराक ओबामा, अध्यक्ष, अमेरिका

* दहशतवादाविरुद्धच्या ठरावातील अपेक्षित मुद्दे

>> दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यासाठी आर्थिक कृती विशिष्ट कार्यगटाची स्थापना करण्यात येणार.

>> हा कार्यगट 'आयएस'सारख्या दहशतवादी संघटनांना मिळणारा निधी रोखण्याचे आणि तेलव्यवहारात होणारा गैरव्यवहार रोखण्याचे काम करणार.

>> तंत्रज्ञान, संवादयंत्रणा, दहशतवादाला चालना देण्यासाठी असणारे स्रोत, इंटरनेट यांपासून दहशतवाद्यांना वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न

शहराला लष्करी छावणीचे रूप

पॅरिसवरील हल्ल्यानंतर संभाव्य धोके टाळण्यासाठी अंताल्या शहराला लष्करी छावणीचे रूप आले आहे. संगीताच्या सर्व मैफिली, अधिकाऱ्यांचे भोजनसमारंभ रद्द करण्यात आले आहेत. हजारो सुरक्षा रक्षक आणि उच्च तंत्रज्ञानाने युक्त टेहळणी यंत्रणा परिषदेवर लक्ष ठेवून आहेत. दहाव्या जी-२० परिषदेसाठी जगभरातून सुमारे १३ हजार अधिकारी, तीन हजार पत्रकार आले आहेत. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे.

बाळ केशव ठाकरे

बाळ केशव ठाकरे

23 जाने1926 ते 17 नोव्हे 2012


                 46 वर्षे
             एकच विचार
             एकच वादळ
           एकच बाण हिंदु
           एकच रंग भगवा
          एकच झेंडा भगवा
        एकच मैदान शिवतीर्थ
          
             एकच वक्ता
हिंदुह्रदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख
     मा.श्री.बाळासाहेब ठाकरे

आणि एकच वाक्य " जमलेल्या
माझ्या तमाम हिंदु बंधुनो, बहिणींनो
आणि मातांनो " आणि त्या लाखो
शिवसैनिकांच्या घोषणांचा कडकडाट पुर्ण हिंदुस्थानात घुमते हे आमचे दैवत

       !! बाळासाहेब ठाकरे !!

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी
लाट.. कोटी कोटी ह्रदययांचा केवळ
अन् केवळ एकच....
      
             " हिंदुह्रदयसम्राट "

एक हात केला कि लाखो माना झुकत..
ना कुठले ताज, ना कुठले तख्त
ना सत्येची हौस, ना पैश्याची लालच
शेवटपर्यंत फक्त आणि फक्त हिंदुसाठी
जगलेल्या माझ्या महाराष्ट्राचा नेता माझे दैवत....

बाळासाहेबांना " मानाचा मुजरा " शेवटपर्यंत अविस्मरणीय....

गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप
असतील
आया ,बहिणींची अब्रू
वाचवण्यासाठी गुंड बना...
हे सांगणारे फक्त  - बाळासाहेब ठाकरे

🚩तृतीय पुण्यस्मरण🚩

Sunday 15 November 2015

मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|
ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:
ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे
स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी
स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति
तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति

सूर्यनमस्कार मन्त्र


1 मित्राय नमः
2 रवये नमः
3 सूर्याय नमः
4 भानवे नमः
5 खगाय नमः
6 पूष्णे नमः
7 हिरण्यगर्भाय नमः
8 मरीचये नमः
9 आदित्याय नमः
10 सवित्रे नमः
11 अर्काय नमः
12 भास्कराय नमः

बँकिंग फसवाफसवी



बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत तसेच ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापासून ते बँकेची खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत या चोरांची मजल गेली आहे.
या फसव्या जाळ्यापासून कसे दूर राहावे, याची ही हेल्पलाइन. 

1.फिशिंग -

फिशिंग दोनप्रकारे करण्यात येते.

(अ) पहिल्या प्रकारात एखाद्या अज्ञात मेल आयडीवरून तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले आहे, अशा मजकुराचा मेल येतो.
बक्ष‌सिाची रक्कम घेण्यासाठी बँक खाते, एटीएम प‌निकार्ड अशी महत्त्वपूर्ण माहिती मागण्यात येते. नायजेरियन व्यक्ती या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असल्याने या प्रकाराला 'नायजेरियन फ्रॉड' असेही म्हटले जाते.

(ब) दुसऱ्या प्रकारात बँकेची खोटी वेबसाइट तयार करून तुम्हाला फसविण्यात येते.
अशा खोट्या वेबसाइटच्या लिंकमध्ये
https च्या ऐवजी http असे असते.
पण केवळ
s नसलेल्या या वेबसाइटकडे घाई-घाईत क्लि‌क करून माहिती दिली जाते आणि पैसे गमावण्याची वेळ येते. 

2.वॉशिंग -

व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलने (व्हीओआयपी) ही फसवणूक केली जाते. यात लक्ष्य असलेल्या व्यक्तीला फोन येतो. यात रेकॉर्ड केलेल्या मेसेजसारखा भासणाऱ्या आवाजात तुमच्या अकाऊंटमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करण्यात येते, त्यासाठी एटीएम पिन मागण्यात येतो किंवा तुमच्या कार्डविषयी असलेली अपूर्ण माहिती घेऊन त्या माध्यमातून पैसे काढण्यात येतात. 

3.मोबाइल फ्रॉड -

बँकेचे अॅप मोबाइलवर डाऊनलोड करून त्याआधारे बँकिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे. परंतु, कंपनीचे बनावट अॅप तयार करून त्याआधारे माहिती मिळवण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.
बँकेचे बनावट अॅप सॉफ्टवेअर डेव्हलपर तयार करतात, त्या माध्यमातून बँकेविषयी तसेच तुमची महत्त्वपूर्ण माहिती मिळवून पैसे काढून घेण्यात येतात.
विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचेही बनावट अॅप तयार करण्यात आले आहे. 

4.मालवेअर -

अशाप्रकारचे फ्रॉड हे कधीही एकट्या-दुकट्या व्यक्तीसोबत होत नाहीत. ग्राहकांच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहिती साठवून ठेवणाऱ्या रिटेल दुकानांमध्ये असे प्रकार घडतात.
या दुकानांमध्ये कार्डांविषयी माहिती साठवलेल्या सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरच्या साहाय्याने घुसखोरी करण्यात येते.
हे सॉफ्टवेअर साठवलेली मा‌हिती मिळवते. या माहितीचा वापर ई-ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा बनावट कार्ड तयार करून खरेदी करण्यात येते. 

5.बटणांना गोंद लावणे -

एटीएम मशीनच्या बटणांना खळ, गम किंवा सोल्युशन लावून ती बटणे काम करणार नाहीत याची काळजी घेतली जाते.
एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड म‌श‌निमध्ये टाकल्यानंतर बटण दाबताना ती दाबली जात नाहीत. अशावेळी भामटे तुमच्याजवळ येऊन तुम्ही कोणती बटणे दाबताय हे पाहतात.
तुम्हाला मदत करण्याचा किंवा तुमची समस्या ऐकण्याचा बहाणा करत पिन नंबर जाणून घेतला जातो.
तसेच, तुमचे कार्ड अडकून असल्यास तुम्ही गेल्यानंतर पिन नंबर वापरून पैसे काढून घेतले जातात. 

6.स्कीमर -

एटीएम मशिन किंवा कार्डद्वारे पैसे अदा करण्याच्या ठिकाणी मशिनना स्कीमर लावण्यात येतात.
हे स्कीमर जिथे कार्ड स्वाइप करण्यात येते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे लावण्यात येते, की तो एटीएम मशिनचाच एक भाग असल्यासारखे दिसते.
जेव्हा तुम्ही मशिनमध्ये कार्ड टाकता किंवा स्वाइप करता त्यावेळी हा स्कीमर तुमच्या कार्डमधील माहिती मिळवते. 

7.मॅन-इन-दी-मिडल -

सार्वजनिक ठिकाणी वायफाय क्षेत्रात दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये घुसखोरी करून माहिती मिळवण्याचा प्रकार म्हणजे मॅन-इन-दी-मिडल. यात हॅकर विविध सॉफ्टवेअरचा वापर करत तुमच्या मोबाइलचा डेटा पाहतो. मोबाइल बँकिंग किंवा इतर काही माहिती असल्यास ती काढून घेतली जाते. 

8.पिन कोड कव्हर करा -

पॉइंट ऑफ सेल किंवा दुकानात पैसे देण्याच्या काऊंटरवर कार्ड वापरून पेमेंट करण्याची वेळ आल्यास कार्डाचा पिन टाइप करताना काळजी घ्या.
विक्रेत्याला कधीही पिन देऊ नका. त्याचप्रमाणे तुमच्या कार्डावर कुठेही पिन लिहून ठेवू नका किंवा कार्ड ठेवत असलेल्या कव्हरमध्ये पिन लिहून ठेऊ नका. 

9.मोबाइल क्रमांक नोंदवा -

मोठ्या व्यवहारांची माहिती एसएमएसने संबंधित ग्राहकाला निःशुल्क देण्याचे बंधन सर्व बँकांवर आहे.
तुम्ही तुमच्या खात्यात करत असलेल्या कोणत्याही व्यवहारांचा अॅलर्ट बँकेकडून मागा. त्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या बँकेकडे नोंदवा. 

10.नियमित खाते तपासा -

खात्यात एखादा गैरव्यवहार झाल्यास त्याची माहिती बऱ्याच दिवसांनंतर बँकेला ग्राहकाकडून दिली जाते. याचे कारण खात्याचे स्टेटमेंट पाहिल्यावरच त्यांच्या ही बाब लक्षात येते. यासाठी ई-बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा. 

11.बँक तपशील गुप्त ठेवा -

माहिती दिल्याशिवाय तुम्हाला बक्षीस मिळणार नाही, असे कुणी सांगितले, तरीही त्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्याचा तपशील कधीही देऊ नका. तुमच्या ईमेलवर एखादा मोबाइल नंबर आल्यास त्यावर कधीही कॉल करू नका.

12.एटीएमजवळ अनोळखी नको -

बऱ्याच एटीएम केंद्रांत बहिर्गोल आरसा असतो. त्याचा वापर करून तुम्ही एटीएमच्या साह्याने व्यवहार करताना कोणी पहात नाही ना याची खात्री करा. 
 

13.ईमेलपासून सावध राहा -

तुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करा, असे सांगणारे ई-मेल तुम्हाला आले असतील, तर अशी कोणतीही माहिती त्यावर देऊ नका. असा ई-मेल हा फिशिंग मेल असू शकतो. याचा परिणाम ओळख चोरीत (आयडेण्टिटी थेफ्ट) होऊ शकतो. 

14.लिंकवर क्लिक करू नका -

तुमच्या ईमेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
अशी लिंक बँकेकडून आलेली असली तरीही लगेच क्लिक न करता त्याचा यूआरएल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
मग हा यूआरएल नव्याने अॅड्रेस बारमध्ये टाइप करा आणि मगच पुढील व्यवहार करा.



शांत रहा बाई

लग्नाच्या आधी तुझ्यासाठी झुरतो,
लग्नाच्या नंतर मागपुढं फिरतो,
दिलेली कामं बरोबर करतो,
झुरतो, फिरतो, फिरतो, करतो,
शांत रहा बाई, तू शांत रहा बाई॥

काही दिवस जातात बरे,
तू म्हणतेस तेच खरे,
तुझ्या मनाने सगळेच ठरे,
बरे ,खरे खरे, बरे खरे बरे ,बरे खरे
शांत रहा बाई, तू शांत -हा बाई॥

घरात असते तुझी वटवट,
बाहेर असते किती कटकट,
यामुळे माझी होतेय फरफट,
वटवट, कटकट,कटकट, वटवट,.
शांत रहा बाई, आता शांत -हा बाई॥

खुशीत असल्यावर असतेस जोमात
नाराज झाल्यावर जातेस कोमात
काय असते ते सांग तुझ्या मनात
जोमात कोमात कोमात जोमात जोमात मनात
शांत रहा बाई, आता शांत -हा बाई॥

कायमच सत्कर्म करीत राहा

एकदा काही लोकांचा समूह चालत चालत पर्यटनाला निघाला.

वाटेत त्यांना एक अंधारी बोगदा लागला.

त्यांना त्या बोगद्यात काहीच दिसत नव्हते.

त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले.

काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणा- या इतरांना टोचू नये,ईजा होवू नये म्हणून ते खडे उचलुन खिशात ठेवायला सुरु केले.

काहींनी जास्त खडे उचलले तर काहींनी कमी उचलले.

काही लोकांनी असा विचार केला की आपण कशाला फुकट उचलायचे.?

आपल्याला त्रास झालाच ना मग तसा इतरांनाही होइल.

त्यामुळे त्यातील काहींनी तर खडे उचललेच नाहीत.

जेव्हा ते सर्वजण त्या बोगद्याच्या बाहेर आले

व खिशातून काढुन टाकण्यासाठी खडे बाहेर काढले तर ते खडे नव्हते तर अस्सल हीरे होते.

त्यावेळी कमी उचललेले लोक हळहळु लागले की जास्त खडे उचलले असते तर आपल्याला हीरे जास्त मिळाले असते.

न उचललेले लोक पश्चाताप करू लागले.

आपले जीवनही या अंधा-या बोगद्यासारखेच असते व खड़े म्हणजे चांगुलपणा किंवा सत्कर्म आहे.

सत्कर्म हिऱ्यासारखे बहुमोल व किंमती आहे....

म्हणुन मिञांनो कायमच सत्कर्म करीत राहा...

आपोपापच फळ मिळेल...!!

(हे माझे लिखाणकाम नाही,परंतु छान आहे.ज्याने कोणी लिहीले त्या व्यक्तीचे आभार )

🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳

व्याख्या ज्या हसवतील

व्याख्या ज्या हसवतील 😃😄😃😄😜😜
💠पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
💠बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
💠चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
💠ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
💠विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.
💠कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा
💠जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
💠कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
💠कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
💠चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह
💠अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
💠मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
💠शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
💠सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
💠वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
💠लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
💠फॅशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
💠पासबुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
💠गॅलरी - मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
💠लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
💠छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
💠परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'
💠परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
💠विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
💠दाढी - आळशीपणा व 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन
💠थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
💠काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव
💠नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
💠घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
💠मन - नेहमी चोरीस जाणारी वस्तू
💠ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
💠विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
💠विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
💠श्रीमंत नवरा - चालतं बोलतं ATM कार्ड
💠श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
💠IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
💠IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
💠बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
💠स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
💠लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना
🍀
व्याख्या आवडल्या तर नक्की शेअर करा... 😂😂😂😄😄😃😃

Saturday 14 November 2015

नाती

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात. आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्याततिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?

जे जवळ जवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दीसले की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता ! एक पाली सारखा

नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन नजाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.

तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं,विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.....

🔹नाती जपण्यात मजा आहे
🔸बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
🔹जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
🔸येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
🔹नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
🔸येताना काही आणायच नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
🔹याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं

पेरिस मधे 14/11........... पॅरिस हादरलं, दहशतवादी हल्ल्यात तब्बल 150 जणांचा मृत्यू

पॅरिस: फ्रान्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तब्बल 150 जणांनी प्राण गमावला आहे. फ्रान्सच्या राजधानी पँरिस मध्ये स्फोट आणि अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 150 जण मारले गेल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी जवळपास 100 जणांना ओलीस ठेवल्याचीही माहिती समजतंय. गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते आहे. पोलिसांकडून सर्व बंदींना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

 – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला
 – पॅरिसमध्ये 7 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट
 – पॅरिसच्या नॅशनल स्टेडियमबाहेर स्फोट
 – पॅरिसमधील हल्ल्यात 140 जण ठार- रॉयटर्स
 – बाटाक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये 100 हून अधिकजण ओलीस
 – गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
 – पॅरिसमधील थिएटर आणि रेस्टॉरंटमध्ये गोळीबार
– पॅरिसमधील अनेक ठिकाणी गोळीबार आणि स्फोट
 – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून हल्ल्याचा निषेध
 – फ्रान्सच्या लोकांवर नाही तर मानवतेवर हल्ला- ओबामा
 – फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून देशाला अतिसतर्कतेचा इशारा
 – फ्रान्सची सर्व उड्डाण रद्द, सर्व सीमा सील
 – संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी लागू
 – 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश- वृत्तसंस्था
– ओलीस ठेवलेल्यांवर गोळीबार करण्यात आला- प्रत्यक्षदर्शी
– अल्लाहू अकबर म्हणत होते दहशतवादी- प्रत्यक्षदर्शी
– संपूर्ण पॅरिसमध्ये संचारबंदी लागू
– हल्ल्यानंतर पॅरिसमधील मेट्रो सेवाही बंद


पॅरिसमधील स्टेडियमबाहेर देखील बॉम्बस्फोट झाला आहे. या स्टेडियममध्ये फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात फुटबॉलचा सामना सुरु होता. हा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद देखील आले होते. मात्र, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कंबोज नावाच्या एका रेस्टॉरंटमध्येदेखील फायरिंग करण्यात आली असल्याची माहिती आहे.


दरम्यान, फ्रान्सच्या पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला दिला आहे. तुर्तास हा हल्ला कोणी केला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र यामध्ये मोठ्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात मशीनगने बेछूट फायरिंग करण्यात आली. या हल्ल्यामुळे पँरिसमधील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून जगभरात अतिसर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Friday 13 November 2015

लेखनकला वर्कशॉप दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला. ही बातमी विस्ताराने लिहा...

नवकथा

मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला.  तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.

************************************

नवकविता

स्टेशनसमोरची रंगहीन टपरी
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी
अंग चोरून पडलेली
वडे तळणाऱ्या माणसाच्या
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब
ठिबकतायत
पुढ्यातल्या कढईत
टप टप टप
येतोय आवाज
चुरर्र चुर्र
ही खरी घामाची कमाई
पुढ्यातल्या
टवका गेलेल्या बशीतला
वडा-पाव खाताना
त्याच्या मनात येउन गेलं
उगाचच

*****************************************

ललित

दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.

'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं.

'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!

******************************************

शामची आई व्हर्जन

'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!'

******************************************

जी ए  कुलकर्णी व्हर्जन

रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या  मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.

************************************************

गो. नि. दांडेकर व्हर्जन

हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?   

*******************************************

ग्रेस व्हर्जन

विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव  खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!  

'कट्यार काळजात घुसली..' AVADHOOT GUPTES post on Katyar.. Post on FB..

लहानपणी आईबाबांच्या तोंडून अनेकदा ऐकलं होतं. पुढे गायक म्हणून कारकीर्द सुरु झाल्यावर संदर्भ गहिरे झाले. अभीषेकिबुवा वगैरे .. सुरत पियाकी.. खाँसाहेब.. व्यक्तिरेखा .. कलाकार .. माणसं .. तुकड्या तुकड्यानं.. जिगसॉ पझल मधल्या सारखं .. रायगड आणि महाराज एकत्र कळत आणि मिळत जावे तसं काहिसं होत होतं..

आणि अचानक!! 'जुरासिक पार्क' film मधे डायनॉसॉरवर रिसर्च करणा-या हिरोला कुणितरी डायरेक्ट हजारो डायनॉसोर्र्सच्या मध्यभागी नेऊन ठेवल्यावर जे वाटावं ना.. तेच नेमकं वाटलं मला. सुबोध भावेचा 'कट्यार .. ' पहिल्यावर!!

अानंद ह्या गोष्टिचा झाला, की मी 'एक तारा' करण्या मागची भूमिका आणि त्यामागचं उद्देश्श्य हे अनेक वर्षांपूर्विच कुणालातरी दिसलं होतं, हे कळलं. माझा मूर्खपणा हा की मी 'ते' कधी अभ्यासलं नव्हतं.. पण माझा शहाणपणा हा की 'ते' न अभ्यासता देखील मलाही 'ते' तितकचं महत्वाचं वाटलं होतं आणि त्या 'ग्रेट' विचारवंतांमधे आणि माझ्या विचारांमधे काहितरी साधर्म्य होतं!!

आणि 'ते' म्हणजे.. कलाकाराचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे "अहंकार"!!

असो!!

मी चित्रपट पाहून बाहेर आल्यावर सुबोधला मिठीच मारली! डोळ्यातले अश्रू थांबवणं अशक्य होतं. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात एवढी मोठी बाजी मारणं.. हे सुबोधच्या अथक परिश्रमाबरोबरच एकतर 'नशीब'!! आणि दुसरं महत्वाचं म्हणजे 'संस्कार'!! 'भावे' आडणावाखेरिज.. 'पुणे' गावाखेरिज.. हे कुणालाही शक्य नाही!! 'जात' न मानणा-यांनी ह्या चित्रपटाचा फक्त 'रिमेक' करुन दाखवावा!! "टिळक" किंवा "कट्यार" करायला "भावे"च लागतात !!

(कृपया नोंद घ्यावी: मी 'भावे' किंवा 'पुणेरी'ही नाही!)

पुन्हा .. असो!!

जुन्या गाण्यांमधली Original Value जपतानाच नवीन गाणी देण्याचं धाडस दाखवणे असो... संहितेमधे राजगायकाची भूमिका लांबवण्याचे धाडस असो.. अमृता बरोबरचा One Shot असो.. प्रत्येक ठिकाणी मला जाणवली ती म्हणजे दिग्दर्शकाची संहितेवरिल 'स्वामित्वा'ची भावना! 'हे सगळं माझं आहे.. आणि मी त्यावर एवढं प्रेम केलंय की त्यामधे वाट्टेल ते बदल करायचा हक्क मला माझ्या ह्या प्रेमानी दिलाय!! "कुणाचा बाप मला 'का?' म्हणून विचारू शकत नाही" ही भावना प्रत्येक फ्रेममधे जाणवते! आणि तीच प्रचंड भावते!!

जोडिला कलाकारांनी जी कामं लाजवाब कामं केलियेत त्याला तोड नाही!! असे सचिनजी दिसलेच नाहीत. त्यांच्या उर्दुच्या अभ्यासाचं चीज एवढं कधी झालंच नाही. त्यांना त्यांच्या 'heroism' ची कवच कुंडलं काढून ठेवून फक्त 'Actor' म्हणून सिद्ध करणारी अशी भूमिका कधी मिळालीच नही. अमृता खानविलकर ही नाच न करता सुद्धा एवढी अपील होऊ शकते हे कधी कळलंच नाही. ती Star सोडता 'अभिनेत्री' म्हणून एवढी कधी भिडलीच नाही. मृण्मयी सुद्धा.. किती वेगळी दिसलिये .. किती वेगळी वागलिये ..

पलसानेंच्या कॅमेर्यापासून ते संतोष फुटाणेंच्या नेपथ्यापर्यंत आणि काजव्यांच्या सीन खाऊन जाण-या Special effect च्या Team पर्यंत प्रत्येकाच्या कामाबद्दल लिहिण्यासारखं खूप खूप आहे!! पण .. असो!!

माझी तमाम मराठी बाधंवांना हीच विनंती आहे आहे की.. जो चित्रपट तुमची नातवंडे दहा दहा वेळा Internet वर पाहून आणखी ३० वर्षांनी तुम्हाला प्रचंड प्रश्न विचारणार अहेत... त्यातला एक प्रश्न "तुम्ही हा चित्रपट theatre मधे पाहिला होता ना?" हा असणार आहे. त्याचं उत्तर 'नाही' असं द्यावं लागल्यास तुमची जी हालत होईल.. ती नको असल्यास हा चित्रपट जरुर.. जरूर theatre मधे जाऊन पहा!!

स्विकार(Acceptence) ...!!

1 ) माझा जन्म कोठे व्हावा ..कोणत्या जाती धर्मात व्हावा..आई वडील कसे असावेत ..हे माझ्या हाती नव्हते ..त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऎवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करुन माझे जिवन नक्कीच सुखी करु शकतो...

२ ) मी स्त्री व्हावे की पुरूष..काळा की गोरा..माझ्या शरिराची ठेवण ..सर्व अवयव ठिकठाक असणे..हे देखिल माझ्या हाती नव्हते..मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे..योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे...

३ ) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती..सामाजिक स्थान..त्यांचे स्वभाव ..हे देखिल माझ्या हाती नव्हते..त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे..

४ ) सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे..त्या मुळे माझ्या आयुष्यात देखिल काही दुःखे असणारच आहेत..ती दुःखे कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही ..त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता..मी त्या दुःखाचे निराकरण करण्या साठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन..

५ ) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी ..माझ्या संपर्कात येणा-या लोकांनी ..माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे..संयम..म्रुदु भाषा..मंगल कामना हे माझ्या हाती आहे..

६ ) माझ्या आयुष्यात घडणा-या घटना..परिस्थिती ..यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते ..मात्र त्या वेळी साकारात्मक विचार अन योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे..

७ ) हे विश्व मी निर्माण केलेले नाही ..कीवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखिल काही कींम्मत नाही तेव्हा..हे असे का ? ते तसे का ?..असे का नाही ..? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी ..जे चूक आहे..अयोग्य आहे..ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हे थोडके नसे..

८ ) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे...

९ ) आज जरी यश..सुख ..सम्रध्दी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे नष्ट होवु शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दुर ठेवले पाहिजे...

१० ) मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत रहाण्या ऎवजी . जे काही मिळाले आहे त्या बाबत मी आभारी असले पाहिजे..जग अधीक चांगले..सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये..

Thursday 12 November 2015

काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छा.....

बाहेर दिवाळीची धामधून सुरु असताना वेटिंग रुममध्ये बसुन, ICU मध्ये आपल्या पेशंट ची काळजी करणाऱ्या बंधू भगिनींना शुभेच्छा

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बाळगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करु शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा...

शेजारणीचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करुन आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा....

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करुन सुखावणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जीभेला मिळावं ही शुभेच्छा....

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा...

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा....

आयुष्यभरात  सर्व  सणवार  रस्त्यावर  साजरे  करतात  त्यां पोलीस  बांधवांना  एक दिवस दिवाळीत कुटुंबात  मिळेल  अशी  शुभेच्छा


...या आणि अशा असंख्य मनःपूर्वक शुभेच्छा.....

Tuesday 10 November 2015

दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.

कोणत्याही पालकांचे मुलांच्या भाविताव्याबाबत हेतू वाईट नसतात, पण उपाय चुकीचे असतात. आपल्या मुलांनी चांगल्यात चांगले करीयर निवडावे अशीच प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी त्यांना उत्तम महाविद्यालयात प्रवेश देण्याचा ते प्रयत्न करतात.मात्र आपली मुले हीच आपल्यासाठी सर्वोत्तम असतात हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

यशस्वी होण्यात ज्ञान व निर्णय क्षमतेचा वाटा 20% तर चिकाटी,आशावाद,टीमवर्क आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यावरच मुलांचे 80% यश अवलंबून असते.शाळा महाविद्यालयात ज्ञान मिळते. उर्वरीत गुण मुलांच्या अंगी बाणवावे लागतात व त्यासाठी पालकांनी सजगपणे प्रयत्न करणे आवश्यक असते. म्हणून पालकांनी मुलांचा उपहास, अपमान करू नये.तसेच त्यांची इतरांशी तुलानाही करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे इमोशनल ब्लँकमेलींग करणे टाळावे.कठोर नियमित कष्ट हाच शाश्वत यश मिळवण्याचा मार्ग असून अल्प प्रयत्नांनी मिळालेले यश फार काळ टिकत नाही, हे समजून घेतले पाहीजे. त्यामुळे मुलांनी निवडलेल्या विषयाचा एकाचित्ताने अभ्यास करण्याचा विचार पालकांनी मुलांत रुजवाला पाहीजे.

निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना अनेकदा ठेच लागेल,पडायला होईल. ते स्वाभाविकच आहे. मात्र पडल्यानंतर तुम्ही किती चटकन स्वत:ला सवारता त्यावर तुमची यशस्वीता अवलंबून असते.कोणत्याही परिस्थितीत हार मानू नाका. चिकाटी आणि चिवटपणाने प्रतिकुलतेवर मात करता येते.भूत आणि भविष्यापेक्षा हाती असणार्या वर्तमानाचा जास्त विचार करा.कारण कोणत्याही चांगल्या कामासाठी आज व आत्तासाराखा उत्तम मुहूर्त नाही,अशी शिकवण पालकांनी मुलांना द्यायला हवी.

मी इंग्रजी भाषेविरूध्द नाही. पण शिक्षक म्हणून मला असे वाटते की, मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतल्याने मुलांची आकलनशक्ती चांगली वाढते. मातृभाषेतून विषय चांगला समजल्यामुळे पाया पक्का होतो. इंगजी माध्यमातून शिकतांना आधी मुले मातृभाषेतून विचार करतात आणि मग इंग्रजीतून. त्यामुळे भारतीय मुलांच्या मेंदूवर अतिरीक्त ताण येतो. आणि अभ्यास फक्त गुणांसाठी केला जातो. हा माझा अनुभव आहे. कारण मी गेली कित्येक वर्षे इंगजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतो आहे. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.मी मातृभाषेचा वृथा अभिमान बाळगणारा नाही; तर मुलांच्या दीर्घकालीन घडण्याचा त्या मागे विचार आहे.

आणि दुसरे म्हणजे परकी कोणतीही भाषा नंतर स्वप्रयत्नाने आत्मसात करता येते. त्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिकायला हवे असे नाही.हा माझा स्वानुभव आहे. कारण मी मुळचा मराठी माध्यमातील असूनही गेली 35 वर्ष मात्र मी कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवतो आहे. मला कुठेही भाषेची अडचण आली नाही.मुळात मातृभाषा पक्की असेल तर मग इतर कुठलीही भाषा शिकणे अवघड नसते.ती आपल्या मेंदूची क्षमता आहे. कारण आकलनशक्तीचा पाया पक्का झलेला असतो.

आपण दूरदृष्टीने विचार न केल्यामुळेच आज मुलांची वैचारीक क्षमता कमी झालेली दिसते.परिणामस्वरूप त्यांना read between lines करता नाही.शब्दाचा फक्त कोशातील अर्थ कळतो पण शब्दामागील भावना कळत नाहीत.आणि पदवी घेतल्यानेच चांगली नोकरी मिळते हाही एक भ्रम आहे. ज्याच्याकडे मेहनतीची तयारी आहे, नवनव्या कल्पना अंमलात आणायची धमक आहे, अपयशातून यशाकडे जाण्याचे जीद्द आहे, अशा लोकांना sky is the limit असते. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. लहानपणीच असे विचार मुलांमध्ये निर्माण केले तर तो फ्क्त परिक्षार्थी न होता खरा विद्यार्थी होईल. त्यासाठी लागणारी आकलनशक्ती, विश्लेषक विचार करण्याची कुवत मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारे वाढू शकते. म्हणून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे.

शिक्षण हे फक्त नोकरी साठी म्हणून न घेता ज्ञानासाठी घेतले तर माणसाच्या बुध्दीची झेप त्याला जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी मिळवून जगण्यास समर्थ करील. म्हणूनच विचार करायला शिकणे जितके मातृभाषेतून सहजसाध्य होईल तितके इंग्रजी माध्यमातून नाही. आपण मुलांना फक्त साक्षर बनवायचे की सुशिक्षीत हे ठरवायची आता वेळ आली आहे. म्हणून आपण र्‍हस्व दृष्टी टाकून देवून दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.