Saturday 14 November 2015

पेरिस मधे 14/11........... पॅरिस हादरलं, दहशतवादी हल्ल्यात तब्बल 150 जणांचा मृत्यू

पॅरिस: फ्रान्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तब्बल 150 जणांनी प्राण गमावला आहे. फ्रान्सच्या राजधानी पँरिस मध्ये स्फोट आणि अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 150 जण मारले गेल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी जवळपास 100 जणांना ओलीस ठेवल्याचीही माहिती समजतंय. गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते आहे. पोलिसांकडून सर्व बंदींना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

 – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला
 – पॅरिसमध्ये 7 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट
 – पॅरिसच्या नॅशनल स्टेडियमबाहेर स्फोट
 – पॅरिसमधील हल्ल्यात 140 जण ठार- रॉयटर्स
 – बाटाक्लान कॉन्सर्ट हॉलमध्ये 100 हून अधिकजण ओलीस
 – गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
 – पॅरिसमधील थिएटर आणि रेस्टॉरंटमध्ये गोळीबार
– पॅरिसमधील अनेक ठिकाणी गोळीबार आणि स्फोट
 – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून हल्ल्याचा निषेध
 – फ्रान्सच्या लोकांवर नाही तर मानवतेवर हल्ला- ओबामा
 – फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून देशाला अतिसतर्कतेचा इशारा
 – फ्रान्सची सर्व उड्डाण रद्द, सर्व सीमा सील
 – संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी लागू
 – 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश- वृत्तसंस्था
– ओलीस ठेवलेल्यांवर गोळीबार करण्यात आला- प्रत्यक्षदर्शी
– अल्लाहू अकबर म्हणत होते दहशतवादी- प्रत्यक्षदर्शी
– संपूर्ण पॅरिसमध्ये संचारबंदी लागू
– हल्ल्यानंतर पॅरिसमधील मेट्रो सेवाही बंद


पॅरिसमधील स्टेडियमबाहेर देखील बॉम्बस्फोट झाला आहे. या स्टेडियममध्ये फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात फुटबॉलचा सामना सुरु होता. हा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद देखील आले होते. मात्र, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कंबोज नावाच्या एका रेस्टॉरंटमध्येदेखील फायरिंग करण्यात आली असल्याची माहिती आहे.


दरम्यान, फ्रान्सच्या पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला दिला आहे. तुर्तास हा हल्ला कोणी केला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र यामध्ये मोठ्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात मशीनगने बेछूट फायरिंग करण्यात आली. या हल्ल्यामुळे पँरिसमधील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून जगभरात अतिसर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment