Wednesday 31 May 2017

महाभारतातील दोन पात्रामधील अतिशय सुरेख संवाद:

कर्ण कृष्णाला विचारतो - " माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले,
कारण मी अनौरस संतती होतो.
यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं,
कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल.
कारण मी क्षत्रिय होतो.

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि
गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला  अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.
तर मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले:
"कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंदीच्या मुलीशी लग्न केले.

माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.
मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल.
धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल, फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा...
प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत

आयुष्य कोणासाठीही सोपे नाही

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते...

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,
किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,
कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

 तरीही
त्यावेळी आपण कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

Sunday 28 May 2017

पु ल देशपांडे लिखित एक सर्वोत्कृष्ट प्रार्थना अणि शुभेच्छा !

हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.

दुसर्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.

टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
 पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय कर.

इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
 मदत करच पण त्यावेळी
माझ तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. अशा प्रसंगी
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची माझी
सवय कमी कर.

केंव्हा तरी माझीही चूक
होउ शकते, कधीतरी माझाही
घोटाळा होऊ शकतो,
 गैरसमजुत होऊ शकते
ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण एक बिलंदर बेरकी
खडूस माणूस म्हणून मी
मरू नये अशी माझी
 प्रामाणिक इच्छा आहे.

विचारवंत होण्यास माझी
ना नाही पण मला लहरी
करू नकोस. दुसर्‍याला
मदत करण्याची इच्छा
आणि बुद्धी जरूर मला
दे पण गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
 इच्छा मला देऊ नकोस.

शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, परमेश्वरा,
ज्यांच्याकडे खरा सल्ला
 मागता येइल असे
मोजके का होईना
 पण चार मित्र दे.

एवढीच माझी प्रार्थना...

    - पु.ल.देशपांडे

Saturday 27 May 2017

देवळांचे अर्थकारण - भावना आणि तर्क

भावना आणि तर्क हे कधी एकत्र असत नाहीत. किंबहुना ह्या दोन गोष्टी नेहमी एकमेकांपासून लांबच असतात.

मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे आणि त्याच्या मेंदूतला केमिकल लोच्या तर्क हा भावने इतक्या लवकर स्वीकारत नाही.

भावना ह्या सोप्या असतात, मेंदूला सहज ग्राह्य असतात

आणि त्या भावना जर चांगल्या शब्दांत गुडाळलेल्या असतील तर आपण फारसा विचार न करता त्या लगेच घेतो.

म्हणूनच व्हॉट्सॅपवर व्हायरल झालेले संदेश हे भावनेला हात घालणारे असतात आणि अनेकदा तर्कहीन असतात.

हिंदूंचे सण जवळ आले की भावनांनी ओथंबलेले संदेश व्हायरल होतात.

होळी, दिवाळी हे कॉमन.

आता त्या पाठोपाठ गणपती हा सण भावनेने ओथंबलेल्या संदेशांच्या पंगतीला आला आहे.

महाराष्ट्रातील सकल प्रदूषणाचा कर्ता एकटा गणपती बाप्पा आहे, हे आपण मनावर ठासून घेत आहोतच.

आता त्यापाठोपाठ एक गाव एक गणपती, गणपतीला फुलं मिठाई नको, लालबागचा राजाच नवसाला पावतो का?

खरं तर कोणताच गणपती नवसाला पावत नाही वगैरे वगैरे संदेश यायला लागले आहेत.

गणपतीच्या अनुषंघाने एका मेसेजमध्ये भारतातील देवळांच्या आणि देवांच्या कमाईवर सवाल उठवला आहे.


तर प्रश्न चांगला आहे, लोकशाहीत अश्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळायलाच हवं.

प्रश्नकर्त्यांचा अधिकारच आहे तो. ह्यालाच लागून आलेला उपप्रश्न म्हणजे

देवळांना पैसे द्यावेच का?

तो पैसा भारतातील गोर गरीब जनतेला, अडल्या नडल्यांना देता येऊ शकत नाही का?

अनेक संसार त्यात सावरले जाऊ शकतात वगैरे वगैरे !


उद्देश चांगला आहे, असा आलेला मेसेजही भावनेच्या पाकात घोळवून काढलेला असल्यामुळे आकर्षक आहे.

पण म्हंटलं ना कि भावना आणि लॉजिक्स हि एकमेकांसोबत कधी जात नाहीत. इथेही तेच झालंय.

ज्या चांगल्या भावनेने आपण गणपतीच्या देणगीचा प्रश्न उचललाय त्याच चांगल्या भावनेने

भारतातल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या तीन गोष्टींच्या आर्थिक व्यापाकडे बघुयात !

ह्यातली आपल्या सर्वांची पहिली आवडती गोष्ट म्हणजे ' चित्रपट ',

दुसरा नवीन लागलेला छंद म्हणजे ' आय पी एल '

आणि तिसरी जिव्हाळ्याची पूर्वापार चालत आलेली गोष्ट म्हणजे

' मद्य अथवा दारू '...

फिल्म फ्रॅटर्निटी वगैरे म्हणतात त्या चित्रपट सृष्टीने २०१५ साली १४०० करोडपेक्षा जास्त धंदा केला होता.

ह्यावर्षी सप्टेंबर पर्यंत १४०० करोडच्या आसपास धंदा केला आहे.

एकट्या 'सुलतान' चित्रपटाची कमाई ३५० कोटी रुपये आहे.

ह्या सर्वात साऊथ इंडियाचा एकही पिक्चर नाही,

'कबाली' हा ब्लॉकबस्टर नाही किंवा 'सैराट' सारख्या इतर प्रादेशिक चित्रपटांची गणना नाही.

शिवाय हा अधिकृत हिशोब आहे, अनधिकृत किती असेल त्याची कल्पना नाही.

ह्याआधीच्या वर्षांच्या कमाईचा हिशोब ह्यात नाहिये.

आपला दुसरा आवडता नवीन छंद म्हणजे 'आय पी एल'.

आयपीएलचा ह्यावर्षीचा टर्नओव्हर १२०० कोटी रुपयांच्या आजूबाजूला आहे.

सोनी मॅक्स चॅनलला ह्यावर्षी फक्त जाहिरातींमधून अपेक्षित असलेला रेव्हेन्यू होता १२०० कोटी रुपये.

शिवाय बी सी सी आयने प्रक्षेपणाचा केलेल्या कराराची किंमत आहे ८२०० कोटी रुपये.

ह्याही सर्व अधिकृतरित्या जाहीर झालेल्या फिगर्स, अनधिकृत काही असेल तर त्याची कल्पना नाही.

भारतातील तिसरा आवडता छंद म्हणजे 'दारू'.

'द हिंदू' च्या आकड्यानुसार भारतात दर वर्षी २० बिलियन लिटर दारू विकली जाते

आणि फक्त दारूचा वर्षभरातला व्यवहार होतो १ लाख कोटी रुपयांहून अधिक.

गणपतीचा किंवा देवळांचा आर्थिक व्यवहार कॅम्पेअर करण्यासाठी मी ह्या तीनच गोष्टी वापरल्या आहेत.

आणि ह्या वापरल्या आहेत कारण देवळातली किंवा गणपतीची देणगी जशी सर्वसामान्यांच्या खिशातून जाते त्याचप्रामाणे

हे सर्व आकडे आपणच आपल्या खिशातून कन्ट्रीब्युत केलेले असतात.

चित्रपट, आयपीएल आणि दारू ह्यासोबत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईल्स, फूड चेन्स, सोनं, चांदी ह्या सर्वांची माहिती यात धरली जाऊ शकते.

पण तेवढं खोलात जायची गरज नाही. कारण तुलनेसाठी ह्या तीनच गोष्टी पुरेश्या आहेत.

त्यातून हा सर्व रॉ डेटा आहे. अजून खोलात शिरलो तर अजूनही बरेच मोठे आकडे हाती येतील.

गंमतीचा भाग असा की ह्या सर्व गोष्टी आपण आता गरज ह्या सदरात टाकल्या आहेत.

पण त्याचवेळी देव हि देखील एक भावनिक गरज आहे हे आपण मान्य करत नाही.

माझा देव हि माझी एक सपोर्ट सिस्टिम आहे

आणि तिचं सगुण स्थान टिकवून ठेवायला मलाच खिशात हात घालावा लागणारे हे आपण मान्य करत नाही.

लालबागच्या राजाच्या पेटीचा जो काही कोट्यांमध्ये हिशोब आहे तो बाहेर काढायला आपण सरसावतो,

त्या पैशाच्या दानात किती लोकांचं कुटुंब चालू शकतं, किती शेतकरी आपलं घर सावरू शकतात हे हिशोब आपण हिरीरीने करतो.

पण दारू पिताना एका बीअरच्या पैशात एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण सुटू शकेल हा हिशोब कुणी करायला जात नाही

की आय पी एलचं तीन चार हजाराचं तिकीट काढताना एखाद्या विद्यार्थ्याचा चार सहा महिन्यांचा अभ्यासाचा खर्च त्यातून भागू शकेल

हा विचार केला जात नाही.

तीच गोष्ट चित्रपटांची.

१०० कोटीचा धंदा केलेला पिक्चरच्या रेव्हेन्यूमध्ये आपलं सहा सातशे रुपयांचं कन्ट्रीब्युशन असतं

आणि तेही कुणाला तरी उपयोगी पडू शकेल हे आपल्याला मान्य करायचं नसतं.

येऊन जाऊन हिशोब सणांच्या आणि देवांच्या नावाखाली खर्च होणाऱ्या पैशाचा मागितला जातो.

लालबाग, सिद्धिविनायक किंवा अजून कोणतीही देवस्थाने ह्यांना मिळणारा पैसा हा सायलेन्सर तुटलेल्या बाईकसारखा आहे,

स्पीड २० चाच पण गोंगाट मात्र हा मोठा !!!


सर्वात महत्वाचं म्हणजे दान धर्म आणि इतर हिशोब ह्यासर्वांवर मेसेजेस आपल्या सणाच्या वेळीच येताना दिसतात.

एखाद्या खानाचा पिक्चर रिलीज होतोय, तो पाहू नका,

ते पैसे एखाद्या संस्थेला द्या

किंवा ३१ डिसेंबरला दारू पिऊ नका ते पैसे एखाद्या कुटुंबाला द्या असं कधी वाचलंय?

असं कधीच होणार नाही.

कारण भावनेत घोळवलेली भाषा वापरून आपले सण त्याने निष्प्रभ होणार नाहीत.

ते काम फक्त होळी, गणपती, दिवाळी ह्यातच होऊ शकतं.

आपली श्रद्धास्थानं बुडवणं, त्यांच्यापासून आपल्याला लांब नेणं हे एक कारस्थान आहे.

लोकांचे आदर्श बुडाले कि देश सहज बुडवता येतो.

भावनिक खच्चीकरण अर्थात डिमोरलायझेशनची हि एक पायरी आहे आणि आपण स्वतः हुन त्यावर जाऊन बसतोय.

त्यामुळे दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.

आपली बुद्धी गहाण टाकू नका आणि बुद्धिभेद करणाऱ्या एकाही मेसेजला बळी पडू नका.

ज्याप्रमाणे समाजात तळागाळातल्या लोकांना हात देणं हे आपलं कर्तव्य आहे

त्याच प्रमाणे

देव, देश आणि धर्म ह्यांना बळ देणं हे आपलं काम आहे आणि ते विसरता कामा नये.

Friday 26 May 2017

ब्रिटनसह 74 देशांमध्ये सायबर हल्ला - रेनसमवेयर

ब्रिटनमधील अनेक रुग्णालयांमधील कॉम्प्युटर्स रेनसमवेयरच्या मदतीने हॅक करण्यात आले आहेत. जगभरातील 74 देश या सायबर हल्ल्याने कचाट्यात सापडले आहेत. या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून जवळपास 75 हजार कॉम्प्युटर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. WanaCrypt 2.0 नावाच्या रेनसमवेयरच्या मदतीने हॅकर्सनी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा खंडित केली आहे.

रेनसमवेयर हा मालवेअरचा एक प्रकार असून त्यातून कॉम्युटरमधील डेटा रिमोटच्या मदतीने लॉक करता येतो. रेनसमवेयरच्या मदतीने हॅक केलेला कॉम्प्युटर अनलॉक करण्यासाठी हॅकर्स पैशांची मागणी करतात. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने नुकताच तयार केलेला प्रोग्रामचा वापर करुन हॅकर्सनी आरोग्य यंत्रणा हॅक केली असावी, असा अंदाज सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रेनसमवेयर ईमेलच्या मदतीने पाठवला जात असून त्या माध्यमातून कॉम्प्युटर हॅक केले जात आहेत. यासोबतच हॅकर्स कॉम्प्रेस्ड आणि एन्क्रिप्टेड फाईल्सच्या मदतीने देखील कॉम्प्युटर्सला लक्ष्य करत आहेत.

सुदैवानं हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी ते पाहूया...

तुमच्या सिस्टममध्ये चांगल्या कंपनीचा अँटी व्हायरस टाकून घ्या. तसेच अँटी व्हायरसची शेवटची तारीख लक्षात ठेऊन ते वेळच्या वेळी अपडेट करा. तसेच तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला जेव्हा कधी मोबाइल, पेन ड्राईव्ह किंवा दुसरे कोणते डिव्हाईस जोडाल तेव्हा ते स्कॅन करुन घ्या. कोणत्या ऑनलाईन साइटवरुन काही डाऊनलोड करण्याआधी पहिले हे पाहा की ती वेबसाइट नोंदणीकृत आहे का. तसेच तुमची सिस्टम वेळच्या वेळी फॉर्मेट करत जा.

ती ..

 तिला ना सगळंच हवं असतं सगळंच करायचं असतं मनापासून मन लावून......

तिला सगळ्याची भारी हौस.. खाण्याची- खिलवण्याची, गाण्याची- कवितेची, फिरण्याची भटकंतीची आणि शांत गझल ऐकण्याची..

 तिला आवड आहे जगण्याची- समरसून , भरभरून

 बरोबर ना ?

खरेदी म्हणजे तर तिचा श्वास ! मग विंडो शोपिंग पण चालतं.. मूड ठीक करायला खरेदी हा एकमेव उपाय..

 संदिप खरे असो किंवा अरूण दाते, आशा भोसले तर वाह.. जगजित ची गझ़ल तर ती ऐकतेच ऐकते आणि उडत्या गाण्यावर ठेका पण धरते..

 लावणी पण निषिद्ध नाही आणि अभंग ही वर्ज्य नाही..
बाहेरचं जग पण तिला खुणावतं, त्याच बरोबर घराकडे तिचं दुर्लक्ष नाही..
कर्तव्यात कणभर कसूर नाही..

 जसा प्रसंग तसा तिचा वेष आणि वागणं.. पूजेला साडी आणि डान्स करताना मिडी , यात तिला वावगं वाटत नाही.. सर्व प्रकारची मजा तिला आवडते, सर्व अनुभव तिला घ्यायची इच्छा आहे..

 तिला घर पण सांभाळायचं आहे, मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, घरातल्या इतर गोष्टीत तिला रस आहे.. आणि त्याच बरोबर तिला स्वतः ची आवड,ऋची पण जपायची आहे.. छंदात मन रमवायचं आहे, काही तरी नवीन, धाडसी करायचं आहे.. सगळ्यांच्या नजरेत स्वतः ला सिद्ध करायचं आहे.. स्वतः चं अस्तित्व तिला खुणावतं आहे..

 समाजाचं  ऋण फेडण्यासाठी श्रम करायची तयारी आहे, स्वतः ची कला जोपासण्यासाठी ती उत्सुक आहे..

केवळ वाहवा मिळवण्यासाठी नव्हे, तर एका कौतुकाच्या शब्दासाठी, तिची सारी धडपड आहे..

तिला जगण्याची आवड आहे, स्वत्व जगण्याची ओढ आहे, मित्र मैत्रिणीमधे रमण्याची आस आहे,

फक्त तिला एक खंबीर साथ हवी आहे, मूक संमती हवी आहे, तिच्या पंखात बळ भरणारी, तिच्या सोबत असणारी प्रेमळ संगत हवी आहे....
..
...प्रत्येक स्त्रीचे अंतरंग
*Group मधिल समस्त मैत्रीणीस समर्पीत...

कन्यादान

बाप  आणि लेक हे नाते शब्दांत मांडणे कठीण..

बाबा हा शहाळ्यासारखा असतो ...

बाहेरून कितीही कठोर असला तरी ....

आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. ...

कुठलीही मुलगी...

जर डोळे  झाकून  एखाद्या पुरुषावर  विश्वास  ठेवू  शकते....तर तो फक्त तिच्या वडिलांवर …

लेक जर घराचे सौख्य असेल तर...

 त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो....

संस्कार देणारी आई असली तरी...
 ते संस्कार जपणारा बाबा असतो.

संयम देणारी आई असली तरी...

 खंबीर बनवणारा बाबाच असतो...

बोट धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो ...

 लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही  बाबा असतो...

कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही  बाबाच असतो...

पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो...

shopping करताना आईने कमी  किमतीचा dress काढला तर....
 हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा dress घेणारासुद्धा बाबाच असतो. ...

आईने काही काम सांगितले तर.... तिला दटावणारासुद्धा बाबाच असतो....

लेकीचे पहिले बोबडे बोल , तिने टाकलेले पहिले पाऊल , तिचे लाडिक वागणे,
 तिची घरभर पैंजणांची छुमछुम हे सगळे पाहून सुखावतो तो बाबा असतो आणि ....

लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा ....
आणि प्रसंगी रागे भरणारा पण बाबाच असतो....

पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते....

लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराहि बाबाच !!!

आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच !!!

ज्या लेकीला २०-२५ वर्षे जीवाच्या पलीकडे सांभाळले तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचे हृदय काय तुटत असेल ह्याची कल्पनाही करता येणार नाही. ..
आर्त धागे तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार.

आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून...
 सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो....

आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना... आतून तुटणारा बाबाच असतो...

"दिल्या घरी सुखी रहा  म्हणताना "
... मनातून खचलेलाही बाबाच असतो...

असा हा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो...

आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. ...

लेकीचा स्वतःपेक्षा  जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो....

लग्नानंतर मुलीचे नाव जरी बदलले तरी....
तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही ....

ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते....

एक गोंडस परी …
                                                     आज जागतिक कन्या  दिन....ज्यांना कन्यारत्न आहेत अशा सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा!!

   👏👏लक्षात ठेवा..👏👏

मुलगा वारस आहे.....मुलगी पारस आहे..

मुलगा वंश आहे........मुलगी अंश आहे.....

मुलगा आन आहे........मुलगी शान आहे...

मुलगा तन आहे........... मुलगी मन आहे....

मुलगा संस्कार आहे... मुलगी संस्कृती आहे

मुलगा आग आहे.......  मुलगी बाग आहे....

मुलगा दवा आहे.........मुलगी दुऑ आहे....

मुलगा भाग्य आहे......मुलगी सौभाग्य आहे

मुलगा शब्द आहे........मुलगी अर्थ आहे....

मुलगा गीत आहे........तर मुलगी संगीत आहे..

👩लेक वाचवा.....
👩लेक वाढवा....
👧लेक घडवा....

ज्याना मुलगी नाही त्यानी सुनेला जीव लावा, 

Forward  to  all .....

BOX OFFICE

नाटकाला जाताना आपण प्रथम नाट्यगृहाबाहेर असलेल्या बुकिंग ऑफिसमधून  तिकिट विकत घेतो. पण तशी पद्धत शेक्सपियरच्या काळात नव्हती. त्याकाळी तिकिटाची खिडकीच नसायची. त्याऐवजी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एक 'मेटल बॉक्स' ठेवलेला असायचा. या बॉक्सच्या फटीतून चार पेनीचं नाणं आत टाकलं की प्रेक्षकांना आत प्रवेश मिळायचा. 

हा बॉक्स इतक्या छोट्या आकाराचा असायचा की तो नाण्यांनी लगेच भरून जायचा. नाण्यांनी भरलेला हा छोटा बॉक्स घेऊन थिएटरचा एक माणूस स्टेजच्या मागच्या बाजूला असलेल्या ऑफिसमध्ये जायचा आणि हा बॉक्स तिथे ठेऊन रिकामा बॉक्स घेऊन परत प्रवेशद्वारापाशी यायचा. येताना ऑफिसच्या दाराला कुलूप लावायला तो विसरायचा नाही. हे सर्व होईपर्यंत प्रवेशद्वाराबाहेर खोळंबलेले प्रेक्षक चार पेनीचं नाणं या बॉक्समध्ये टाकून आत शिरायचे.

हे छोटे बॉक्सेस ज्या खोलीत ठेवले जायचे त्या खोलीला 'बॉक्स ऑफिस' म्हणायचे. आजही 'बॉक्स ऑफिस' हा शब्दप्रयोग आपण वापरतो, पण त्याचा उगम शेक्सपियरच्या काळात झाला.

छोटे बॉक्स ठेवण्यापेक्षा आणि ते सतत बदलत बसण्यापेक्षा एक मोठा बॉक्स का ठेवायचे नाहीत, असं कुणाला वाटू शकेल. त्याचं कारण हेच होतं की, हा बॉक्स पळवला जाईल याची भीती असायची. शेक्सपियरचं 'ग्लोब थिएटर' ज्या भागात होतं, तिथे चोर, डाकू, दरोडेखोर, वेश्या यांचा सुळसुळाट होता आणि चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण मोठं होतं. नाण्यांनी भरलेला मोठा बॉक्स चोरीला गेला, तर नुकसानही तेवढंच मोठं होणार, हा विचार छोटे बॉक्सेस वापरण्यामागे असायचा...

अनलिमिटेड बुफे

अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)

काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!

१) बुफेची किंमत कशी ठरते? - साधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका. BBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns, साधारण ५०० रुपये किलो, म्हणून BBQ Nation चा मांसाहारी बुफे ७५०-८०० रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही पोटभर prawns खाल्ले तरी त्यांना नुकसान नाही.

२) वेलकम ड्रिंक, सूप चे मायाजाल - सगळ्या बुफेच्या ठिकाणी self service असली तरी welcome drink किंवा सूप मात्र तुम्हाला टेबल वर दिले जाते. त्यात तुमचे खूप काही आदरातिथ्य करायचा हेतू नसतो. गोड welcome drink ने तुमच्या मेंदूला एक छान साखरेचा डोस मिळतो आणि तुमचा मेंदू तुमची भुकेची मात्रा कमी करून टाकतो, पोट रिकामं असलं तरी. सूप तुमच्या पोटात भरपूर जागा व्यापून टाकतात आणि मग परत जास्त खायची इच्छा राहत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्यात हॉटेलवाला तुम्हाला तुमची १.५ लिटर जठरक्षमता वापरण्यापासून थांबवत असतो.

३) वेटर, एक उपद्रवी सैनिक - तुम्ही BBQ Nation मध्ये non-veg grill लावायला सांगा आणि गंमत पहा. येणारा वेटर तुम्हाला जास्तीत जास्त चिकन किंवा फिश (दोन्ही १२० रुपये किलो) खायला आणून देत जाईल. तुम्ही मटण किंवा Prawns (४५० ते ५०० रुपये किलो) कितीही मागत राहा, तुम्हाला ते अत्यंत कमी आणि खूप उशीराने दिले जाते. अपेक्षा एवढीच असते की तुम्ही भुकेच्या तडाख्यात दुसरे काहीतरी खायला घ्यावे आणि तुमचा surplus कमी करून घ्यावा. ५०० रुपये किलोच्या prawns च्या जागी तुम्ही १२० रुपये किलोचे चिकन खाल्ले तर ७५० रुपयांतले तुम्ही जास्तीत जास्त २०० रुपये वसूल करणार, बाकी हॉटेलचा फायदा.

४) चाट, आईसक्रीम - कित्येक बुफेच्या ठिकाणी चाट, पापडीवाला ठेला हमखास लावलेला असतो. बायका आपल्या नैसर्गिक स्वभावाने तिकडे जाऊन पाणीपुरी खाऊन पोट भरतात. डोक्यावरून पाणी, ५० रुपयांत एका बाईला चुरमुरे असलेली भेळ/चाट किंवा पाणीपुरी देऊन तिचे उरलेले पैसे हॉटेलवाला स्वतःकडे खेचत असतो. आईस्क्रीमची अवस्थाही तीच! स्वस्तातले फॅमिली पॅक वाले आईसक्रीम (२०० रुपये किलो) तुम्हाला नावाला डायफ्रूट शिंपडून चारायला हॉटेलवाल्याचा फायदाच असतो.

५) फळे, सॅलड - कितीही आरोग्यदायी असली तरी तुम्हाला ४० रुपये किलोचे कलिंगड, खरबूज, गाजर, काकडी चारण्याइतका आनंद हॉटेलवाला दुसऱ्या कशातच घेऊ शकत नाही. त्यामुळे हे हमखास तिथे मुबलक असणार.

६) गोडधोड/डेझर्ट - कितीही अट्टल खाणारा पाव किलोपेक्षा जास्त गोडधोड नाही खाऊ शकत, मेंदू खाऊच देत नाही. बुफेमधल्या डेझर्टच्या किमती पाहिल्या तर जास्तीत जास्त १०० रुपयांचे गोडधोड तुम्ही खाऊ शकता.

७) शाकाहारी लोक - तुम्ही समस्त बुफेवाल्यांसाठी हक्काचे बकरे असता. १० रुपये किलोचा बटाटा "तंदूर आलू" म्हणून तुम्हाला खाताना पाहून हॉटेलवाले ऑर्गझमीक आनंद घेत असतात. पनीर खा, स्वीट खा, फळे खा ... काहीही खा! तुमच्यासाठी हॉटेलवाला ३००-३५० च्या वर काहीही खर्चत नाही, आणि तुम्ही ७०० रुपये दक्षिणा देऊन येता.

तेव्हा खवय्यांनो, बुफेचा पैसा खऱ्या अर्थाने वसूल करायचा असेल तर फक्त महागातले अन्न, पोटभर खाऊन यावे. आणि तुम्हाला जर फक्त हौसेसाठीच बुफे खायचं असेल तर मग ५० रुपयांचे चाट खाऊन ८०० रुपये देऊन या... कुणाचं काहीही जात नाही!

- डॉ. विनय काटे

Monday 8 May 2017

ईशोपनिषद्

शुक्लयजुर्वेदाच्या कण्वशाखेच्या संहितेचा चाळिसावा अध्याय म्हणजे ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद होय. ह्या उपनिषदाचा मंत्र भागात समावेश होतो म्हणून ह्या उपनिषदाला जास्त महत्त्व आहे. सर्व उपनिषदात ह्याला पहिले स्थान दिले जाते. या उपनिषदाचा पहिला मंत्र "ईशावास्यमिदं" असा सुरू होतो म्हणून ह्याचे नाव ईशावास्योपनिषद् असे रूढ झाले.
॥ शान्तिपाठ ॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥
सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत् सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत् व्यक्त स्थितीस आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते.

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम् ॥१॥
अर्थ - ह्या जगात जे काही उत्पन्न होणारे व विलयास जाणारे आहे ते सर्व ईशतत्त्वाचा निवास असलेले आहे. त्या ईशतत्त्वाच्या साक्षीने त्यागबुद्धी ठेवून भोग्य वस्तूंचा उपभोग घे. ही सर्व प्रकारची सृष्टीतील संपदा खरोखर कोणाच्या मालकीची आहे? कोणाचीही एकट्याची नाही, म्हणून गिधाडासारखे काहीही हव्यासाने घेऊ नकोस. ॥१॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः । एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥२॥
अर्थ - ह्या जगात शास्त्रविहित कर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा केली पाहिजे. ह्या प्रकारे कर्म केल्यास तुला (मनुष्याला) कर्म बंधनकारक होत नाही. ह्याहून दुसरा कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग नाही. ॥२॥

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३॥
अर्थ - जे अंधाराने, तमाने भरलेले लोक (स्थाने) आहेत त्यांचे नाव ’असुर्या’ लोक असे आहे. जे आत्मघात (आत्मा म्हणजेच देहादी उपाधी असे मानणे हाच आत्मघात) करतात ते मरणानंतर ह्याच ’असुर्या’ लोकाप्रत जातात. ॥३॥

अनैजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्रुवन् पूर्वमर्षत् | तद्भावतोऽन्यानत्येति तिष्ठत् । तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥४॥
अर्थ - ईश्वर सर्वांच्या आधीचा आहे. त्याचे ज्ञान इतर कोणाही देवांना नाही पण तो मात्र सर्व देवांना जाणतो. तो स्वतः स्थिर असून सर्वांना चालना देतो. सर्वांपेक्षा (मनापेक्षाही) तो वेगवान आहे. त्याच्याच सत्तेच्या आधीन होऊन सर्व पंचमहाभूते काम करतात. उदा. वारा वाहतो तो ईश्वराच्या सत्तेने, स्वतःच्या सत्तेने नव्हे.

तदेजति तन्निजति तद्दूरे दद्वन्तिके । तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः ॥५॥
अर्थ - ते ब्रह्म (किंवा ईश्वर) चेतन आहे तसेच स्थिरही आहे. एकाच वेळी त्याच्या ठिकाणी परस्परविरोधी भाव, सामर्थ्य, गुण आणि क्रिया असू शकतात. तोच त्याच्या अचिंत्य शक्तीचा महिमा आहे. अवतार कार्य ही जी त्याची लीला आहे ते त्याचे चल रूप आहे. आणि निर्गुणनिराकारपणे राहणे; अविनाशी, अविकारी असणे हे त्याचे स्थिरत्व आहे. ज्याला श्रद्धा व प्रेम नाही त्याला त्याचे दर्शन होत नाही; म्हणूनच तो सर्वात दूर आहे. पण प्रेमाने, आर्ततेने हाक मारताच तो क्षणार्धात भक्ताजवळ येऊन उभा राहतो, म्हणून तो सर्वात जवळ आहे. तसेच जेथे अग्नी, चंद्र वा सूर्य ह्यांचा प्रकाश पोहचत नाही तेथे त्याचे परमधाम आहे; अर्थात तो फार दूर आहे. पण जीवरूपाने सर्वांच्या अंतःरंगात आहे म्हणून सर्वात जवळ आहे. ॥५॥

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥६॥
अर्थ - ईश्वराची आराधना / भक्ती करणाऱ्या भक्ताच्या मनाची शांत स्थिती कशी असते आणि कोणत्या प्रचीतीमुळे ती तशी होते ते ह्या मंत्रात सांगितले आहे. जो स्वतःमध्ये सर्व जगाला पाहातो आणि जगातील सर्व वस्तुमात्राच्या ठिकाणी स्वतःला पाहातो; त्याला दुसऱ्या कोणाचाही व कशाचाही तिरस्कार अथवा घृणा वाटत नाही. (कारण तशी घृणा केली तर आपणच आपली घृणा केली असे होईल.) तो सर्वत्र एकच ईशतत्त्व पाहातो. ॥६॥

यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद् विजानतः । तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ॥७॥
अर्थ - पहिल्या श्लोकात "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः" असे सांगितले. त्याग्यात भोग व भोगात कर्तृत्वभावनेचा त्याग आणि कोणाचेही धन (सर्व प्रकारचे सुख) हिरावून घेऊ नये हा संदेश दिला. नंतर तिरस्कार नसावा हे सांगितले. ह्या मंत्रात मोह (सुखामुळे) व शोक (दुःखामुळे) नसावेत असे सांगितले आहे आणि त्याची कारणमीमांसाही केली आहे. जर दुजेपणाच आपल्या जाणीवेत नसेल तर आपली एखादी वस्तू नष्ट झाली, दुसऱ्याने कोणीतरी नेली किंवा हवीशी वाटली पण मिळाली नाही तर मोह वाटणे किंवा शोक वाटणे ह्या गोष्टीच शक्य नाहीत. अशा व्यक्तीची शांती कशानेही ढळत नाही. त्याला सर्वत्र ऐक्याचाच अनुभव येत असतो. परमेश्वर माझ्यात आणि इतरांमध्ये एकत्वाने नांदत आहे अशी त्याची दृढ धारणा असते. त्याची बुद्धी सदैव "सम" च असते.

स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयंभूर्याथातत्थ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥८॥
अर्थ - ज्याची अशी लोभ, मोह, शोकरहित समाधानी ऐक्यभावना दृढ असते तो महात्मा परमेश्वरस्वरूप होतो. परमेश्वर कसा आहे तर सर्वसाक्षी, स्वयंभू, सर्व वैभवसंपन्न, शरीर अविनाशी असलेला, तेजोमय, सर्वज्ञ, ज्ञानस्वरूप व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना योग्य त्याच स्थितीत ठेवणारा असा आहे. ॥८॥

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते । ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥९॥
अर्थ - अज्ञानी लोक तर ईश्वराच्या अप्राप्तीरूपी अंधारात, जेथे काही दिसत नाही त्या अंधकारात पडतात. हे अविद्येने घडते. पण विद्याभास करणारे व त्यातच सर्वस्वी बुडून राहिलेले अर्थात ज्ञानी, विद्यावंतही जाणूनबुजूनही त्या अंधारात शिरतात. ॥९॥

अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१०॥
अर्थ - आत्मज्ञानी, धैर्यशील लोकांनी आम्हाला जे नीट शिकविले आहे ते आम्ही ऐकले आहे; ते म्हणजे विद्या व अविद्या ह्यांचा अर्थ अगदीच वेगळा आहे. ॥१०॥

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥ ११॥
अर्थ - कर्म व अकर्म ह्यांचे रहस्य मोठमोठे विद्वान पुरुषही जाणत नाहीत. त्यामुळे ज्ञानाचा अभिमानी मनुष्य कर्म हे ब्रह्मप्राप्तीला बाधक समजतो आणि उचित, विहित, अटळ कर्माचाही चुकीने त्याग करतो. पण त्या त्यागामुळे त्याची कर्म बंधनातून सुटका होतच नाही कारण कर्म न करणे हेच त्याचे कर्म होते. मोहाने/रागाने त्याग केला तर तो राजस/तामस त्याग; त्याग ठरत नाही. विहित कर्म अनासक्त राहून करणे हाच त्याग होय आणि अशा कर्मानेच "मृत्युं तीर्त्वा" म्हणजे कर्मबंधनच न लागल्यामुळे जन्ममृत्युच्या साखळीतून सुटका होते. उलट ज्ञानीपणाच्या अभिमानाने स्वैर व अविहित कर्मे घडून मनुष्य प्रमादी होतो आणि पुढे मूढ योनीतही जन्माला येतो. म्हणूनच कर्म हे जरी अविद्येच्या, मायेच्या, द्वैताच्या प्रांतातले असले तरीही त्याचे अनासक्ती व ईश्वरार्पण बुद्धीच्या आश्रयाने आचरण केले तर मनुष्य मृत्युलोकातून तरतो आणि भगवंताचे स्वरूप व कार्य जाणून तो अमृतत्वास पोहोचतो.

अन्धं तमः प्रविशन्ति येऽसंभूतिमुपासते. ततो भूय इव ते तमो य उ संभूत्यां रताः ॥१२॥
अर्थ - जे लोक देव, पितर मानव आदींची उपासना करतात ते तर अज्ञानाच्या अंधारात राहतातच पण जे परमेश्वराच्या अनादिअनंत रूपाची उपासना करतात आणि तीतच मग्न असतात ते ही पुन्हा जास्तच अंधारात प्रवेश करतात. ॥१२॥

अन्यदेवाहुः संभवादन्यदाहुरसंभवात् । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद् विचचक्षिरे ॥१३॥
अर्थ - परमेश्वराची सर्वात्मभावाने उपासना करणे हाच ’संभव’ (संभूति) खरा अर्थ होय. तसेच परमेश्वराची आज्ञापालन करण्याचा भाग म्हणून देव, ब्राह्मण, गुरु, माता, पिता आदींचा पूज्य भावाने आदर करणे, त्यांची पूजा, सेवा करणे हा ’असंभव’ (असंभूति) चा खरा अर्थ होय. म्हणजेच विनाशशील आराध्य दैवताच्या ठिकाणीही परमेश्वराच्या अविनाशी स्वरूपाचीच आराधना करण्याची भावना ठेवणे, तसेच स्वतःकडे कर्तेपणाचा अभिमान न धरणे होय.

संभूतिं च विनाशं च यस्तद् वेदोभयóè सह । विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥१४॥
अर्थ - अविनाशी परब्रह्म जो जाणतो व विनाशशील देवादिकांनाही जाणतो, तो त्या देवतांच्या उपासनेतूनही मृत्युवर मात करतो आणि परमेश्वराच्या आराधनेने तर तो पूर्ण अमृतत्त्व प्राप्त करतो. विनाशशील देवांकडून मिळणारे फळ क्षणजीवी आहे. जेवढे भोग्य पदार्थ आहेत ते सगळे परिणामी दुःखच देणारे असतात. पण त्या सर्वांत जी मूळ सत्ता आहे, शक्ती आहे ती परमेश्वराचीच आहे आणि देवादिकांसाठी जरी आपण उपासना केली तरी ती परमेश्वराचीच उपासना असते; अशा स्पष्ट धारणेने साधक जरी अन्य देवतांची उपासना करील तरीही तो मृत्युंजय होईल आणि संभूती म्हणजे परमेश्वराचेच व्यापक रूप जो मनी आणून त्याची आराधना करील तो ही जन्म-मरणापलीकडे शाश्वत अमृतरूप असा होईल. ॥१४॥

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥
अर्थ - सत्यावर मायेचे आवरण पडलेले आहे, ते आवरण दूर कर अशी पूषन् नामक सूर्यदेवतेची प्रार्थना ह्या श्लोकात आहे. परमेश्वराचे दर्शन घडण्याच्या बाबतीत "सोन्याचे पात्र" आड येते. परमेश्वराने कृपा करून मूळच्या आपल्या अव्यक्त रूपावर आलेले मायेचे आवरण दूर करावे. त्यानेच आमच्या दृष्टीला सत्य काय ते कळेल. साधक स्वप्रयत्नाने नित्यानित्यविवेक करील. पण सत्यस्वरूपाचा साक्षात्कार परमेश्वरी कृपेनेच होतो. सांसारीक जीवनात सुखोपभोग हे माणसाला मोठे विलोभनीय वाटतात म्हणून सोन्याचे पात्र अशा रूपकाचा उपयोग केला गेला आहे. ॥१५॥

पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह । तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥१६॥
अर्थ - येथे पूषा, ऋषी, यम, सूर्य, प्राजापत्य इ. नावांनी ईश्वराला संबोधित केले आहे आणि अशी प्रार्थना केली आहे की, हे ईश्वरा, तुझे जे उत्तम कल्याणकारक रूप मी पाहिन, ज्या तुझ्या परमरूपाचे मी ध्यान करीन तो मीच आहे असा मला अनुभव येवो. ॥१६॥

वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तóèशरीरम् । ॐ क्रतो स्मर कृतóèस्मर क्रतो स्मर कृतं स्मर ॥१७॥
अर्थ - प्राणापानादि वायू आणि सृष्टीतील वायू मिळून हे शरीर भस्म होऊन जावो पण आत्मरूपात अमरत्वच राहू दे. ह्या देहाचाही यज्ञ होऊ दे. हे यज्ञमय परमेश्वरा, माझे सर्व कर्म लक्षात घे आणि कर्माचा निवाडा करून मला अमृतमय अर्थात मुक्त कर. ॥१७॥

अग्ने नय सुपथा राये अस्मान् । विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां । ते नम उक्तिं विधेम ॥१८॥
अर्थ - हे अग्ने, आम्हाला चांगल्या मार्गाने आणि जगातील सर्वोच्च असे धन किंवा संपदा म्हणजे परमेश्वराची भक्ती ती आम्हाला मिळो. हे देवा, तू ज्ञानी असून सर्व कर्मे जाणतोसच. जी आमच्या मार्गात अडथळा आणणारी पापे आहेत ती तू युद्ध करून नष्ट कर. आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो. ॥१८॥
॥ शान्तिपाठ ॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ॥

Sunday 7 May 2017

ऋषिपंचमीची कहाणी

एका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशीं काय झालं? त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसाच घरांत कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी! दोघंहि आपल्या मुलाच्या घरीं होतीं. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचर घेई.
एके दिवशीं त्याच्या घरीं श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, “आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक कर.” ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झाला? खिरीचं भांडं उघडं होतं त्यांत सर्पानं आपलं गरळ टाकलं. हें त्या कुत्रीनं पाहिलं. मनांत विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन खाऊन खिरींच्या पातल्याला शिवली.
ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं. नि कुत्रीच्या कंबरेंत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवूं घातलं. कुत्रीला कांहीं उष्टंमाष्टं देखील घातलं नाहीं. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हां ती आपल्या नवर्‍याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडूं लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, “मी उपाशी आहे. मला अन्न नाहीं, पाणी नाहीं, खिरीच्या पातेल्यांत सर्पानं गरळ टाकलं, तें माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवलें. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीत माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करूं?”
बैलानं तिला उत्तर दिलं, “तूं आदल्या जन्मीं विटाळशीचा विटाळ घरांत कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालों. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं.” हें भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनांत फार दुःखी झाला.
दुसरे दिवशीं सकाळीं उठला, घोर अरण्यांत गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, “तुं असा चिंताक्रांत कां आहेस?” मुलानं सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे, आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चिंतेत मी पडलों आहे. कृपा करून मला उपाय सांगा.” तेव्हां ऋषींनीं सांगितलं, “तूं ऋषिपंचमीचं व्रत कर. तें व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पक्षांतली पंचमी येते. त्या दिवशीं काय करावं?
ऐन दुपारच्या वेळीं नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आंवळकाठीं कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेलीं वस्त्रें नेसावीं. चांगल्या ठिकाणीं जावं. अरुंधतीसह सप्तऋषींचीं पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटीं उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहींसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनीं इच्छिलं कार्य होतं.”
मुलानं तें व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापांस दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहींसा झाला. आकाशांतून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेलीं. मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो.
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

Udemy Coupon Codes

Learn Rubiks Cube
please like & share
https://www.udemy.com/solving-rubiks-cube-made-easy/?couponCode=HALF

Online Course on Meditation
please like & share
https://www.udemy.com/meditation-first-step-last-step/?couponCode=HALF

Learn REBT Online
please like & share
https://www.udemy.com/introduction-to-rebt-rational-emotive-behavior-therapy/?couponCode=HALF

Saturday 6 May 2017

घनश्याम श्रीधराची भूपाळी

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला । उठीं लवकरि वनमाळी | उदयाचळीं मित्र आला ॥ ध्रु ॥
सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं । अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी । अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी । प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी । करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं । यमुनाजळासी जाती मुकुंदा | दध्योदन भक्षीं ॥ मुक्तता होऊं पाहे । कमळिणीपासुनियां भ्रमरा ॥ पूर्वदिशे मुख धुतलें । होतसे नाश तिमिरा ॥ उठिं लवकरि गोविंदा । सांवळ्या नंदकुमारा । मुखप्रक्षालन करीं अंगिकारी भाकर-काला ॥ १ ॥
घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती । गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति जाती ॥ प्रवर्तोनि गृहकर्मी रंगावळि घालूं पाहती । आनंदकंदा ! प्रभात झाली उठ सरली राती ॥ काढीं धार क्षीरपात्र घेउनि धेनू हंबरती । द्वारी उभे गोपाळ तुजला हांक मारुनि बाहती ॥ हे सुमनहार कंठी । घालि या गुंजमाळा । हाती वेत्रकाष्ठ बरवें । कांबळा घेइं काळा ॥ ममात्मजा मधुसूदना । ह्रुषीकेशी जगत्पाळा । हंबरताति वांसरे हरि धेनुस्तन-पानाला ॥ २ ॥
प्रातः स्नाने करुनि गोपिका अलंकार नटती । कुंकुमादि चर्चुनी मंथनालागिं आरंभिती । प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळि गाती । अर्घ्यदान देउनियां द्विजजन देवार्चन करिती ॥ नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णु-पूजा समर्पितीस्मार्त शिवार्चनसक्त, शक्तितें शाक्त आराधिती ॥ ऋषिगण आश्रमवासी । जे कां निरंजनी धाले । अरुणोदय होतांचि । आपुले ध्यानिं मग्न झाले ॥ पंचपंच-उषःकालीं । रविचक्र निघों आलें । येवढा वेळ निजलासिम्हणुनि हरि कळेल नंदाला ॥ ३ ॥
विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी । अध्यापन गुरु करिति शिष्यही अध्यायना उदयीं ॥ याज्ञिकजन कुंडांत आहुती टाकिताति पाहीं । रविप्रभा पडुनियां उजळल्या शुद्ध दिशा दाही ॥ हे माझे सावंळे पाडसे उठिं कृष्णाबाई । सिद्ध सवें बळिराम घेउनि गोधनें वना जाई ॥ मुनिजनमानसहंसा । गोपीमनःकमलभृंगा । मुरहर पंकजपाणी । पद्मनाम श्रीरंगा ॥ शकटांतक सर्वेशा । हे हरि प्रतापतुंगा । कोटिरवींहुनि तेज आगळें तुझिया वदनाला | होनाजी बाळा नित्य ध्यातसे ह्रुदयि नाममाळा ॥ ४ ॥

Friday 5 May 2017

गजेंद्र मोक्ष

गजेंद्रमोक्ष :--
गजा दे जो मुक्ती त्वरित विभु नक्रासि दमुनी
मुनी ज्याला शास्त्रीं हरि म्हणति त्यालाचि नमुनी
कथा ते संक्षेपें कथिन बरि पक्षींद्र गमना
मनामध्यें ध्यान द्विरदवरदा दुःख शमना ॥१॥

जळीं दांतें नक्र द्विरदपदमांसास्थि उकरी
करी प्राणत्यागी सुमति सुचली तों झडकरी
करी धांवा कीं वो सुलभ वर जो देवनिकरीं
करीं घे अर्पाया कमळ पदपद्यें सुखकरी ॥२॥

नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपति हरी
हरी जो तापातें उचलुनि कृपासिं धुलहरी
हरी वाटे काळा करिस विपती मृत्युभुजगा
जगाचा तूं ऐसा धनि कवण तो पाव मज गा ॥३॥

वदे दुःखी तेव्हां म्हणउनि कळे दिवनिकरा
करावा तो मुक्त स्वशरण गमे श्रीप्रियकरा
करीं चक्रें शस्त्र प्रभु उचलि यानीं खगमनीं
मनीं साक्षी तो ये गज जळज घे तो स्वनमनीं ॥४॥

असा मी तो आत्मा त्रिदशनिकरां वंद्य सकळां
कळाया ही ये त्यासह करि तया मुक्त विकळा
कळा प्रेतप्राय स्मरण करि त्यातें न अवधी
वधी नक्रातें त्या अवसरिं कृपाब्धी निरवधी ॥५॥

मृताच्या त्या तोंडामधुनि पद तो हा झडकरी
करी तें वोढे ना प्रभुच करुणा मागुति करी
करीं दोंपायातें सह उचलि यानीं सुखकरी
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरीं ॥६॥

भुजा चारी पीतांबरधर असी मूर्ति बरवी
रवी जाणों हातीं रथचरण तें दीप्ति मिरवी
गजा एके हातीं जळजयुग दोहीं शुभकरीं
करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरी ॥७॥

स्तवी ब्रह्मा शंभू त्रिदशपति तो मुक्तिहि नवा
नवा भक्तीची हे गति दिधलि ज्याला अभिनवा
न वाटे त्यां सर्वा हरिविण धनी आणिक जगा
जगाया हे भक्ती प्रभुच म्हणती ईश मज गा ॥८॥

पदें तेव्हां सर्वद्विरदवरदा श्रीपति असा
असारीं संसारीं गजगति असी गातचि असा
पहाटे हें गाय प्रतिदिनिंहि माझें चरित रे
तरे दुःखाब्धी तो नपरमपदींहूनि उतरे ॥९॥

गजाची जे मुक्ती क्रमुनि इतरां शक्ति नजनीं
जनीं गाती त्याला फळ परम या विष्णुभजनीं
जनीं ध्वंसस्वामी करि भजक हो गातचि असा
असारीं संसारीं म्हणुनि विनवी वामन असा ॥१०॥
--वामनपंडित

Thursday 4 May 2017

कणा केशवसुत

ओळखलत का सर मला पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलाला वरती पाहून,
गंगामाई आली पाहुनी, गेली घरट्यात राहून,
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाइल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.

गंगास्तव

( श्लोक १ ते २६ पर्यंत शिखरिणीवृत्त )
तुझे जे श्रीगंगे ! जरि दिसति सामान्य, तरि ते रिते कल्पांतींही न पडति, मुखीं नामधरिते. कवींचे, प्रेमानें स्तवन करितां, दाटति गळे. गळे ज्यांचें, तोयीं तव, शव, महादेव सगळे. ॥१॥ न कंठीं घालाया यम चुकुनिही पाश उकली; कलि स्पर्शेना त्या, कुगति तरि त्याचीच चुकली; पडे ज्याचें, नीरीं तव, भसित देसी सुपद या; दयाळे ! पावे त्या सुकृतिहृदयीं बोध उदया. ॥२॥ त्वदंभोबिंदूशीं नुरवि करितां वाद पगडी रस स्वर्गींचा, या समुचित कसा पादप गडी ? तुवां मोक्ष प्राण्या, सहज घडतां सेवन, दिला भजे श्रीशाला जें सुयश, तुज तें देवनदिला. ॥३॥ पराघाही प्राणी द्युनदि ! घडतां मज्जन हरी तयातें श्रीशंबु प्रभुचि न म्हणे मज्जन हरी. ‘ करीत प्रेमानें श्रवण मम पाथोरव रहा ’ असें गंगे ! मातें म्हणसि जरि तूं, थोर वर हा. ॥४॥ तुझा जो संसारीं अजितचि, जसा तो सुत रणीं. दृढा तूं, श्रीगंगे ! सति ! भवसमुद्रीं सुतरणी. ‘ तुवां केले प्राणी हरिहर, ’ असें आइकविते न मच्चित्ता वेडें करितिल कसे आइ ! कवि ते ? ॥५॥ सम श्रीशाचा कीं तव सुमहिमा, यासि कलिनें न मागें सारावें अतिशुचिस अत्यंतमलिनें. ‘ जयी व्हावा विप्रा सुरनदि ! न सोनार दमुनीं, ’ जगीं मिथ्याभाषी भगवति ! नसो नारदमुनी. ॥६॥ वदे ज्ञाता, ‘ मुक्त त्वरित तुज गंगा करिल गा ! ’ मला नाहीं संताहुनि इतर या भूवरि लगा. तुला आलों आहें जननि ! कर जोडूनि शरण; स्वतीरीं त्वां द्यावें द्रवुनि मज काशींत मरण. ॥७॥ महोदारे ! गंगे ! अगणित महादोष हरिला; दिला दीनोद्धारें बहुतचि तुवां तोष हरिला. न कोणीही पापी जन म्हणुनि जागा ढकलिला; सदा बाधे त्रास भ्रमकर तुझा गाढ कलिला. ॥८॥ गळावा त्वत्तीरीं, भगवति ! न हा देह सदनीं. पडो गंगे ! तूझें, मरणसमयीं, तोय वदनीं. विवेकीं यावें, जें धवळपण हेरंबरदनीं. भवीं हो त्वन्नेत्र, प्रभुनयन तें जेंवि मदनीं. ॥९॥ पहातां दीनातें, सकरुण खरा तो कळकळे. द्रवेना तत्प्रेमा भगवति ! मना पोकळ कळे. तव स्नेहा नाहीं जननि ! उपमा; तापलि कडे मुला घे जी साची, ढकलि उपमात पलिकडे. ॥१०॥ समर्था तूं, चित्तीं भवभय धरूं कां पतित मीं ? रवीच्या पार्श्वींचे, न, पडुनि कधीं, कांपति, तमीं. जगन्माते ! गंगे ! अभयवर तो दे, वसविता त्वदंकीं, हृत्पद्माप्रति सुखद तो देव सविता. ॥११॥ जगन्माते ! गंगे ! प्रवर वर दे; पाव; नत मीं निवासार्थी आहें, चिर तव तटीं पावनतमीं. न देणें भारी हें, वर बहुत देतीसचि, वसे वक, व्याळ, व्याघ्र, प्रिय करुनि घेती, सचिवसे. ॥१२॥ सदाही संसारीं विषयरत जो मानव ढिला, तया देसी, द्यावा बहुतचि जसा मान वढिला. असें केलें गंगे ! चिर हरिपणें कीं हरपणें विराजावें जीवें, कृपणपण जेणें हरपणें. ॥१३॥ सदा देवू गंगे ! सदमृत तुझें शुद्धरुचितें, नुपेक्षू; पापी मीं जरि, तरि मला उद्धरुचि तें. नकोचि स्वर्गींचें, सुवुरुवचनें; ज्या सपकसें कळे, तो त्यासाठीं करिल गुणवेत्ता तप कसें ? ॥१४॥ न कंटाळावें त्वां, सुरतटिनि ! हें होय रुचिर स्वयें दीनोद्धारव्रत वरुनि पाळूनि सुचिर. जितें श्रीवाल्मीकिप्रमुख कवि गाती, तिस तरी स्तवूं, कीं तूं माते ! खळभवनदीं होतिस तरी. ॥१५॥ तुवां मत्पत्राला जननि ! दिधला मान, कळलें; तुझें, कारुण्यार्द्रे !, मन मजकडे स्पष्ट वळलें. सुखें येणें झालें, सकळहि पथीं विघ्न टळलें. प्रसू प्रक्षाळील त्वरीत न कसी बाल मळलें ? ॥१६॥ करी सुग्रीवार्थ प्रभुवर जसा वाळिशमना, तसें दे, आधीतें मथुनि, सुख या बाळिशमना. तुझ्या पायां झाला द्युनदि ! जरि हा पाप नत गे ! समर्थातें जातां शरण, पळही ताप न तगे. ॥१७॥ न थोराहीं कोण्ही स्वपदनत मोहा निरविला; सदा योग्या होय द्युनदि ! न तमोहानि रविला ? सुखें न्हाल्या - प्याल्यावरिहि तुझिया भव्य सलिला, जनें भावें, विष्णुप्रभुपदसुते ! काय कलिला ? ॥१८॥ सुखी केले रामें, मुनिसमचि, भागीरथि ! कपी. यशा या जो तो हे, तव अमृत जैसें, पथिक पी. तुझी ही श्रीगंगे ! नुरवि जनमोहाहिम, हिमा सुकीर्ति; ज्ञात्यांला म्हणविच ‘ नमो ’ हाहि महिमा. ॥१९॥ यदुत्पन्ना तूं, त्या नच कृपणवाणी परिसवे. सवेग श्रीभर्ता सुखवि करिपा यापरि सवे. तसीच श्रीगंगे ! प्रकृति तव कीं नित्य रसदा. सदा देवर्षींच्या निवविसि, यशें शोभसि सदा. ॥२०॥ नको दुग्धाब्धीचें, जरि महित आहे, सुतट तें. तुझें दे, याणेंचि द्रुत उर अरींचें उतटतें. तया स्वीकारीना, त्यजुनि बरवें हा जवळिल; स्वयें या बाळाच्या विधिहि न मना आज वळिल. ॥२१॥ न यावा श्रीगंगे ! तव सुवदना बोल ‘ चिप ’ हा. रहाया त्वत्तीरीं जन सकळही लोलचि पहा. म्हणावें त्वां क्षिप्र, ‘ त्यजुनि, धरिला आळस, मज प्रियें अर्थें, घेसी जरि बहु शिशो ! आळ, समज. ’ ॥२२॥ तुझ्या तीरीं नीरें हृदय रमतें, दु:ख शमतें; यशोगानें पानें कुमत गळतें, विघ्न टळतें. कळी भंगे गंगे !, षडरि झुरती, दोष नुरती; दिली नामें, रामें तसिच जगतीला निजगती. ॥२३॥ द्रवावें त्वां गंगे ! द्रवुनि भगवत्कीर्ति वळली. कृपा केली जी, ती बहु म्हणुनि सर्वत्र कळली. म्हण प्रेमें, ‘ सेवीं, प्रमुदित रहा, ’ मीं नर मला न कां द्यावें ? ओघीं तव मकर हा मीन रमला. ॥२४॥ यमाच्या, दृष्टीतें न हरिहरहे दे, वहिवर. तपस्वी देतात, स्तवन करितां, देवहि वर. न या ठावें, जाणे परम पटु जो तो कवि, हित. स्वयें माता पाहे, किमपि नुपजे तोक, विहित. ॥२५॥ नसे लोकीं अन्या अगति गति धन्या तुजविना. स्वजन्म त्वद्रोधीं कवण कृतबोधीं उजविना ? कृपा गंगे ! तोकीं कर, पसरितों कीं पदर हा. मयूरा या दीना, सकळबळहीना, वद ‘ रहा. ’ ॥२६॥
( वृत्त - पृथ्वी )
अनेक शत पाळिसी अकृप जंतु जे घातकी. समुद्धरिसि जाह्नवि ! त्रिपथगे ! महापातकी. नसे जड मयूर हा, द्रवुनि यासि दे आसरा. करील सुरभी सुखी, जवळ आलिया, वासरा. ॥२७॥ फ़िरे वृक, दशास्यही, द्युनदि ! ऐकिली मात ती. पयें अहि जसे, तसे कुमति ते वरें, मातती. शिरींहि परमेश्वरें चढविलीस तूं, तो भली तुलाचि म्हणतो, तुझी बहु सुकीर्ति हे शोभली. ॥२८॥
( वृत्त - शार्दूलविक्रीडित )
श्रीभागीरथि ! सेवटीं निजतटीं दे वास या, हा किती ? कोणीही शरणागता, सदय जे ज्ञाते, न ते हाकिती. माता, धांवुनि आलिया स्वनिकट, ग्रीष्मातपीं तापल्या आधीं कीं कुरवाळिती, निवविती, स्नेहें, मुला आपल्या. ॥२९॥
( वृत्त - स्रग्धरा )
देवूनि क्षिप्र आधीं अभयवर, भवत्रस्त हें, तोक पाळीं राहेना त्वन्मृदंकीं, विधिलिखित असे भोग जो तो, कपाळीं. लाजाया, भक्तभाळा भगवति ! तुझिया, जिष्णुचें भाळ, लागे, माते ! माथांचि वाहे तुज, तरिच महादेवही भाळला गे. ॥३०॥
( वृत्त - सवाई )
मज्जननक्षयदु:ख हरो तव मज्जन सन्ननसंमतसंगे ! कीं तुझिया चरणस्मरणें कळिकाळ महादुरिताचळ भंगे; कोण असा जन ? यन्मन न त्वदुदार यशींच निरंतर रंगे; दीन मयूर गळां पडला शरणागत, हा अभयोचित गंगे ! ॥३१॥
( वृत्त - घनाक्षरी )
तारिले त्वां बहु जंतु, । त्यांचे न गणुनि मंतु.
तुझ्या स्नाना सप्ततंतु । मोटे मोटे लाजती;
अंतीं होतां स्मृती मात्र, । प्राणी तव दयापात्र, हरिहरतुल्यगात्र । होवुनीयां, साजती; असीं तुझीं यशें फ़ार । त्रिभुवनीं वारंवार गंगे ! माते ! अत्युदार । भावें नित्य गाजती; पाव नता, पावनांत । ख्याता, दया जी मनांत भक्ता मयूरा जनांत । धन्य करो आज ती. ॥३२॥
( वृत्त - अश्वधाटी )
सारी महापाप, वारी तपस्ताप, हारी तुझें आप सर्वा जना; रंगे यशीं सर्व, भंगे द्विषद्रर्व, गंगे ! गमे खर्व मेरू मना; माते ! तुझे पाय दाते, दुजे काय या ते नको, हाय देती धना; गावें सदा तीर भावें, सुखें नीर प्यावें, म्हणे धीरगी ते ‘ न ’ ना. ॥३३॥ आगा विलोकुनि, न रागासि येसि, अनुरागा त्यजूनि, सदये ! ‘ यागादि सर्व फ़ळ मागा ’ असें म्हणसि, भागासि भव्य पद ये; कागाहि विष्णुपदि ! जागा मिळे, भजक जागा स्वयेंचि करिसी; नागास्यसेचि तुजला गात ते, दुरित आगामि तेंहि हरिशी. ॥३४॥
( वृत्त - दंडक )
भजति पशुहि जे तुतें, होति नाकीं सदा शक्रसे, संपदा - सेविते, हृष्टधी देवि ! ते; पुरमुरहरमूर्तकीर्ते ! प्रसिद्धे ! तुझ्या कीर्तिसत्रीं सुखें जेविते, सृष्टिचे जे विते; अमरतटिनि ! सांग तूंचि स्वयें काय तान्हेलिया द्यावया आसरा, वीट यावा सरा ? भगवति ! म्हण आपुल्या सद्यशा, नित्य लाजावया शंबुचा सासरा ‘ चीट ’ या वासरा. ॥३५॥
( वृत्त - चामर )
सर्व जीवसृष्टिच्ये अनंत भव्य संपदे ! देवि ! जाह्नवि ! स्वभक्तदुष्कृताद्रिकंपदे ! आपल्या तटीं वसीव हा मयूर सेवटीं ब्राह्मणप्रियार्थ विष्णु बाळसा वसे वटीं. ॥३६॥
( वृत्त - पंचचामर )
नको करूं विचार फ़ार, सार कीर्ति आयती, मिळे सुदीन - रक्षणें तुला, न योग्य काय ती ? अजामिळादिरक्षणें यश प्रभूत साधुनीं, प्रभु प्रसिद्ध वर्णिला प्रसन्नबुद्धि साधुनीं. ॥३७॥
( संस्कृत - आर्या )
शिवविष्णुभक्तया sलंभूतदयाधर्मसक्तया देवि ! वत्सस्त्वा जनन्या सह संयोज्योsवने भ्रान्त:.
( संस्कृत - गीति )
भागीरथ्यास्तीरे बालकमिव देवि ! मातुरङके माम् स्थापय माsपयशोsस्तु स्वर्धुन्या मम तवाप्युदाराया:.
( प्राकृत - गीति )
श्रीकाशींत रहावें हें चित्तीं, परि नसेचि धन कांहीं कनकांहीं तर्पावे प्रभुनीं सद्गुणचि जेंवि जनकांहीं.

गजाननस्तव

श्रीगजवदना देवा ! व्हायासि भवीं गतच्यथ मन, मुनी,
पुरुषार्थसिद्धिकामें, पूजिति भावें तुज प्रथम नमुनी. १

व्हावें शुचि, सेवुनि तव आंगण, पतितें, न तें सदाचराण ?
न वरावे, ध्याया तुज, कां गणपतितें नतें सदा चरण ? २

पुरुषार्थाचीं देसी प्रेमें भजकांस मोरया ! दानें
नच पसरावें मुख, जळनिधिच्या जलदासमोर, यादानें. ३

ऐकावें त्वां प्रभुनें निजवर्णन जें विनायका ! याचें
निजबाळवचन म्हणती पितृकर्ण न जेंवि नायकायाचें. ४

ब्रह्मांडाधार तुझे जरि दिसती हस्त-पाद आखुडसे,
शिखिसिंहवासुकीतें दापीच, त्वद्भयें न आख्य डसे. ५

विघ्न तुला कर जोडिते, सोडिति त्यां, जे त्वदंघ्रि आठविती
स्वजनांतरायशमना ! हरिहरहि तुला निरोप पाठविती. ६

हेरंबा ! अंबा तुज अंकीं घेती, बसोनि पर्यंकीं
हें किति ? परम प्रेमें बससी रतिजानिच्याहि अर्यंकीं. ७

तूं विद्यांचा दाता, अससि, विसावा महेश्वरा ताता,
धन्या दुर्गा माता, प्रसवुनि तुज विघ्नवारिभृद्वाता. ८

तूं सिद्धिबुद्धिभर्ता; देवा ! ब्रह्मांडसृष्टिचा कर्ता,
अमररिपूंचा हर्ता; म्हणता ब्रह्मादिकां न ये वर्ता. ९

विघ्नहरा ! सुखसेव्या ! तूं मण्यवतंस मानिसी दूर्वा
देसी श्री विद्या ती; स्पष्ट म्हणे विधिहि, ‘ हे नव्हे पूर्वा ’. १०

चिंतामणि तूंचि खरा; पर जड जनमहित सर्वथा खोटा
गुणलव यास्तव तव पदपद्मरज:स्पर्शसिद्ध तो गोटा. ११

जडकवि झाले, ध्यातां त्वज्ञ्ज्ञानांकुर, असे सुदंता ! ते
रोमांचिततनु हौनि, जन सेविति सर्व या उदंतातें. १२

वरदा ! श्रीगजतुंडा ! लाजवितें यश तुझें अमृतकुंडा
भक्तातें तव शुंडा म्हणते, ‘ ध्या मज; न आणिका धुंडा ’. १३

ध्यातां विस्मृत निजसुख वरवि, प्राचीन देव दोंदानें
केले तुंदिल, रसना वरविप्राची न दे वदों दानें. १४

तूं परमसुखसुततृप्त स्पष्ट, म्हणुनि अससि नित्य दोंदील
किति म्हणती, ‘ ब्रह्मांडें उदरीं प्रभुवर्य कां न कोंदील ? ’ १५

‘ अभिमतवरदान वरा ’ हें गंडस्थळ तुझें सदान वदे
सुरस अळिकुळास जसें, नतवृंदासहि तसें, सदा नव दे. १६

जी पंचसुरतरुद्युति. हरिसी तूं देव पंचकर तीतें
पावति दास मनें तव पदपद्मपरागसंचक रतीतें. १७

ऐकाया बहु वांछिति संतत तव भव्य कर्ण नवचपळ
म्हणुनच, तुज स्तुतिरता न गमे, नसतां स्ववर्णनवच, पळ. १८

तुजपासुनि भय काळव्याळ मरूरेश्वरा ! सदा पावे
मग कोण प्रबळ इतर ? जे त्वत्तेजें प्रभो ! न दापावे १९

त्वन्नामचि मोहातें नेतें, घेवूनि पाठ, विलयाते
करिशिल दया जयावरि, धन्य पुरुष तोचि आठविल यातें. २०

ज्याच्या शकप्रमुख त्रिदश अशेषहि शिरें पदा शिवतो
गजवदना ! स्वात्म्याहुनि बहु मानितसे तुतें सदाशिव तो. २१

रामसुत मयूर करी, नमुनि, मयूरेश्वरप्रभुस्तवन
या एकवीस आर्यादूर्वा वाहे पदीं, करो अवन. २२

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् । करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।। ।। गणपतिबाप्पा मोरया ।।

Cube Training Classes Pune, Bhushan 9370571465

Today Spend Quality Time with your KIDS,
Learn to solve the Rubik's Cube.
Advantages -
Increases IQ level.
Improves concentration, patience and builds confidence.
Sharpens memory and improves hand-eye coordination.
Benefits all ages and gender.

Time Required - 4-8 hours
Fees -
trainers home - 100 Rs/hr
students home - 250 Rs/hr
Contact - 9370571465 (Bhushan Kulkarni)


Tuesday 2 May 2017

हनुमान स्तुती

|| श्री हनुमान स्तुती ||
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||१||

तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे |
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ||
तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||२||

गिळायासी जाता तया भास्करासी |
तिथे राहु तो येउनी त्याजपासी ||
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||३||

खरा ब्रह्मचारी मनाते विचारी |
म्हणोनी तया भेटला रावणारी ||
दयासागारू भक्तीने गौरविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||४||

सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा |
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा ||
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||५||

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी |
समस्तांपुढे तापसी निर्विकारी ||
नमू जावया लागी रे मोक्षपंथा |
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||

Monday 1 May 2017

अरे संसार संसार

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।

अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।

अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।

अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।

अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।

एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।

देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।

अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।

असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।

अगा वैकुंठीच्या राया

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥