Wednesday 22 March 2017

सायली काव्य

सायली’ हा आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव शब्दाधारीत काव्यप्रकार आहे. [१]

‘हा क्षण’ (दिर्घकथा), ‘अनामिका’ (कविता संग्रह) लिहिणारे नवसाहित्यिक ‘विशाल समाधान इंगळे’ यांच्या लिखाणात सर्वप्रथम या प्रकारच्या रचना दिसून येतात.
अगदी अल्पकाळातच हा नविन काव्यप्रकार लोकप्रिय झाला असून इतर अनेक कविंनीही या प्रकारात रचना केल्या आहेत. काही निवडक कवितांचे संकलन करुन विशाल इंगळे यांनी ‘सायली’ याच नावाने नुकताच एक कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. या संग्रहात एकूण २८ कविंच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.[२] [३]

सायली रचनेचे नियम

  • पहिल्या ओळीत एक शब्द,
  • दुसऱ्या ओळीत दोन शब्द,
  • तिसऱ्या ओळीत तीन शब्द,
  • चौथ्या ओळीत दोन शब्द,
  • पाचव्या ओळीत एक शब्द, आणि
  • कविता आशयपूर्ण असावी.
५ ओळी, ९ शब्द, आशययुक्त. असा फक्त ९ शब्दांचा आणि पाच ओळींचा हा नियमबध्द पण तितकाच सोपी काव्यप्रकार.

No comments:

Post a Comment